कोल्हापूर

उत्सव पुनर्चक्रीकरणाचा

CD

69796
उत्सव पुनर्चक्रीकरणाचात
कोल्हापूरकरांकडून चार टन कचरा दान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः अवनि व किर्लोस्कर ऑईल इंजिन्सतर्फे आयोजित ‘उत्सव पुनर्चक्रीकरणाचा‘मध्ये उभारलेल्या पुनर्चक्रीकरणाच्या भिंतीत कोल्हापूरकरांनी चार टन पुनर्वापर करता येणारा कचरा जमा केला. केवळ चार दिवस राजर्षी शाहू स्मारक भवनच्या बाहेर भिंत उभारली होती. या मोहिमेत घरातील जुने कपडे, ई-वेस्ट, खेळणी, पुठ्ठा, रद्दी यासह इतर वस्तू दान केल्या.
पर्यावरण दिनानिमित्त ५ जूनला ही भिंत खुली केली. पहिले दोन दिवस प्रतिसाद थंड होता. शनिवारी, रविवारी सुटीच्या निमित्ताने कोल्हापूरकरांनी घरातील जुन्या वस्तू पुनर्चक्रीकरणासाठी आणून दिल्या. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही या मोहिमेला भेट देऊन कौतुक केले. या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता निर्माण चौकातील अवनि संस्थेच्या खत निर्मिती प्रकल्पावर आणि शिरोली जकात नाका इथे कायमस्वरूपी ही भिंत सुरू ठेवणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी सांगितले. या भिंतीच्या माध्यमातून जमा झालेल्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. मोहिमेसाठी वनिता कांबळे, साताप्पा मोहिते, अक्षय कांबळे, नयन जाधव, सुरेश बालुरगी, वैजंता गुंडेवाडी, मंगल कांबळे, बनाबाई कांबळे यांनी परिश्रम घेतले.
------
असा झाला जमा कचरा
*कपडे - २ टन
* रद्दी - ७०० किलो
* इलेक्‍ट्रिक वस्तू - ४०० किलो
* प्लास्टिक - ४०० किलो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT