छायाचित्रे : मोहन मेस्त्री
महाद्वार रोडवर ‘जीवघेणी’ कसरतच
अपघाताने मर्यादा उघड; वाहतूक नियमांकडे चालकांचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः महाद्वार रोडवर भरधाव वेगाने शिरलेल्या मोटारीने मंगळवारी रात्री अनेकांचा थरकाप उडवला. अनेकांनी जवळून मृत्यू पाहिल्याचे सांगितले. संतप्त जमावाने चोप देत मद्यधुंद चालक प्रसाद दत्तात्रय सुतार (वय २९, वखारभाग, सांगली) याला पकडून जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर महाद्वार रोडवरील ही ‘जीवघेणी’ कसरत प्रकर्षाने जाणवली. वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्याचा बंदोबस्त करण्यासाठी वाहतूक शाखेने पुढाकार घेण्याची गरज आहे. बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी हा रस्ता गर्दीने व्यापलेला असतो. दिवसभर स्थानिकांच्या खरेदीसह भाविकांचीही रेलचेल दिसून येते. ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी, भेंडे गल्ली हे महाद्वार रोडला जोडले जाणारे रस्तेही अशाच गर्दीने भरलेले दिसून येतात. या मार्गावर एकेरी मार्गाच्या नियमावलीकडे दुर्लक्ष करून वाहनचालक जातात.
----
फेरीवाले, अस्ताव्यस्त पार्किंग
महाद्वार रोड, ताराबाई रोडवर दुतर्फा कपडे, चप्पल, फळे, सण-उत्सवांना लागणारे साहित्य विक्रीचे साहित्य विकले जाते. त्यासमोर थांबणारे ग्राहक वाहने रस्त्यातच उभी करतात. मध्यभागी चार ते पाच फुटांचा रस्ता उरतो. त्यावरून दुचाकी, चारचाकींची वाहतूक सुरू असते. यातही एखादे मोठे वाहन आलेच तर वाहतूक कोंडी होऊन ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
वाहतूक नियमांची पायमल्ली
बिनखांबी गणेश मंदिरकडून मिरजकर तिकटीकडे जाणारा मार्ग एकेरी असला तरी अनेकजण मिरजकर तिकटीकडून येऊन बिनखांबी गणेश मंदिर चौकातून महाद्वार रोडवर वळतात. अशीच अवस्था जोतिबा रोडकडून बाबूजमाल तालीम रस्ता, संभवनाथ मंदिर ते गुजरी, छत्रपती शिवाजी चौक ते भेंडे गल्ली या मार्गावर आहे.
-
उलटे जाणाऱ्यांना रोखणार कोण...
जोतिबा दर्शनाहून येणारे अनेक भाविक मोबाईलवरील मॅपच्या आधारे जुना बुधवार पेठेकडून थेट पापाची तिकटीजवळ पोहोचतात. तेथून अंबाबाई मंदिराकडे जाण्यासाठी एकेरी मार्गाचा नियम डावलून महाद्वार रोडच्या गर्दीत शिरतात. मंगळवारी रात्रीही असाच प्रकार घडला. सांगलीहून आलेल्या मद्यधुंद चालकाने पापाची तिकडीकडून भरधाव वेगाने मोटार महाद्वार रोडवर आणली. सुदैवाने गुजरी कॉर्नर येथे एका दुचाकीला धडक होताच नागरिकांनी चालकाला रोखले. त्याला बाहेर ओढून चोप दिला. यानंतर पोलिसांच्या हवाली केले. पापाची तिकटी येथे वाहतूक पोलिस तैनात नसेल तर असे प्रकार वारंवार घडतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.