कोल्हापूर

वृत्तमालिका भाग ३

CD

लोगो टुडे १ वर आहे
भाग ३
दळणवळणाचे पूल बनले ‘कच्चे’

फोटो
72677
72678


झाडांनी झाकोळला देखणा जयंती पूल
१४६ वर्षे झाली तरी दणकट; पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची गरज
उदयसिंग पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : दगडांपासून बनवलेली कमान, घुमट, नक्षीदार खांबांमुळे देखणा असलेला जयंती पूल दोन्ही बाजूला उगवलेल्या झाडांमुळे झाकोळला आहे. शहरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा दाब या पुलावर असून, १४६ वर्षे झाली तरी अजूनही दणकट आहे. दगडी बांधकामात झाडांची मुळे असल्याने इतक्या वर्षांनंतर पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची गरज आहे.
जयंती पुलाचे बांधकाम १८७६ ते १८७९ कालावधीतील आहे. जुन्या शहरातून कसबा बावड्याकडे जाण्यासाठी या पुलाचा २०१२ पर्यंत दोन्हीकडील वाहनांसाठी वापर केला जात होता. शेजारी नवीन पूल बांधल्याने एकेरी वाहतूक सुरू झाली. दगडी बांधकाम असले तरी त्यावरील नक्षीकामामुळे देखणेपणा आला आहे. दगडी कमानी, पिलर यापासून पुलावरील दोन्ही बाजूच्या संरक्षक भिंतीही दगडाच्या आहेत. त्या संरक्षक भिंतीच्या शेवटच्या टोकांवर नक्षीदार घुमट तसेच नक्षीदार दगड बसवले आहेत. संरक्षक भिंतीच्या कमानीवरील काही दगड हलू लागले आहेत. या पुलाजवळ नवीन पूल बांधला आहे. त्याच्या जवळूनच पाण्याची वाहिनी गेली आहे. त्यामुळे पुलाची एक बाजूच पाहता येते. दिसणाऱ्या बाजूचे पुलाचे बांधकाम भक्कम दिसत असले तरी दुसऱ्या बाजूला काय झाले आहे, हे समजत नाही.
या पुलावर दोन्ही बाजूला झाडे उगवली आहेत. एका बाजूचे झाड तर शेजारी जमिनीवर असलेल्या झाडातील एक भाग वाटण्यासारखे मोठे झाले आहे.
२०१७ मध्ये झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटवेळी या पुलासाठी नेहमी देखरेख ठेवण्याची गरज अधोरेखित केली होती. पुलावरील झाडांची ही स्थिती पाहिल्यानंतर महापालिकेकडून देखरेख काय केली? असा प्रश्‍न पडतो. किमान त्या झाडांची वेळोवेळी तोड अपेक्षित आहे. फक्त त्यावर हेरिटेज पद्धतीचे विजेचे खांब बसवले होते. देखणा व हेरिटेज असलेला हा पूल दुर्लक्षित राहू नये, याची खबरदारी महापालिकेने घेतली पाहिजे.
(समाप्त)

.........
दहा पुलांसाठी
महापालिकेचा प्रस्ताव
महापालिकेने शहरातील दहा पुलांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडे सुमारे दोन कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. जयंती पुलासाठी आठ लाख २४ हजार, शाहू पुलासाठी १८ लाख ८५ हजार, छत्रपती संभाजी पुलासाठी १८ लाख ७८ हजार, विल्सन पुलासाठी सात लाख २९ हजार, शेळके पुलासाठी २७ लाख ५४ हजार आणि फुलेवाडी पुलासाठी १७ लाख १८ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. हुतात्मा पार्ककडील दक्षिण व उत्तर बाजूच्या पुलासाठी ५९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
..............

‘स्ट्रक्टवेल’ करणार
पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट
महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर शहरातील १० पुलांचे २०१७ मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट स्ट्रक्टवेल कंपनीकडून करून घेतले होते. त्यांनी सुचविलेल्या शिफारशीनुसार महापालिकेने शासनाकडे निधी मागितला होता. त्यासाठी काही तरतूद झालेली नाही. त्या ऑडिटला आठ वर्षे होत आली आहेत. पुलांच्या क्षमतेबाबत महापालिकेने पुन्हा एकदा स्ट्रक्टवेल कंपनीकडून ऑडिट करून घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT