कोल्हापूर

टुडे १०२ मेन

CD

महापालिका फोटो
--
इचलकरंजीत वाढल्या राजकीय हालचाली
महापालिका निवडणूक; ‘महाविकास’ची उद्या बैठक, महायुतीत शांतता
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २१ ः महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे. दुसरीकडे, राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. या निवडणुकीत व्यूहरचना आखण्यासाठी सोमवारी (ता. २३) महाविकास आघाडीची बैठक होत आहे, तर महायुतीच्या बैठकीची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा लागली आहे. इचलकरंजी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या पहिल्या सभागृहात जाण्यासाठी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. मात्र सध्या राजकीय परिस्थितीचा कोणालाच अंदाज येत नसल्यामुळे संभ्रमात आहेत, तर कार्यकर्तेही संभाव्य घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, प्रभागाची रचना कशी असेल, याची सध्या इच्छुक उमेदवारांना हुरहूर लागली आहे. संभाव्य प्रभागात येणाऱ्या परिसरातील प्रश्नांची माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे. महापालिकेतही त्यांची हळूहळू वर्दळ वाढत आहे, तर सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींशी संपर्क साधून उमेदवारीबाबत चाचपणी करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर, पुढील रणनीती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीने सोमवारी बैठक आयोजित केली आहे. यात स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढविण्याऐवजी एका चिन्हावर लढविण्याबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. याआधी झालेल्या बैठकीत या निर्णयाबाबत एकवाक्यता झाली होती. आता त्याला बैठकीत गती दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीबाबतची चर्चा केली जाऊ शकते.
महायुतीत मात्र सध्या कमालीची शांतता आहे. भाजपमधील हाळवणकर गटाच्या भूमिकेकडे विशेष लक्ष असणार आहे. आवाडे-हाळवणकर यांच्यात जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्यानंतरच महायुतीची बैठक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आमदार राहुल आवाडे विदेश दौऱ्यावर आहेत. ते परतल्यानंतर महायुतीमधील हालचालींना गती येण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना झाल्यानंतरच पाहू, अशी भूमिका महायुतीतील घटक पक्षांच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
------------------
इच्छुकांची कोंडी
सध्या शहरात संभाव्य राजकीय चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे इच्छुकांची घालमेल वाढत आहे. आपणास उमेदवारी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागणार काय, याचा अंदाज इच्छुक मंडळी घेत आहेत. शहरातील राजकीय चित्र स्पष्ट झाल्यानंतरच इच्छुकांची कोंडी फुटणार आहे. त्यामुळे पुढील काळात पुढील राजकीय घडामोडीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT