कोल्हापूर

सरनाईक कॉलनी पाणी व्यवस्था

CD

72552
सरनाईक कॉलनी परिसरात
पिण्याच्या पाण्याची सोय करा
कर्तृत्व सामाजिक संस्थेतर्फे महापालिकेला निवेदन

कोल्हापूर, ता. २३ ः सरनाईक कॉलनी, शिवोदय कॉलनी, द्वारकामाईनगर या भागात पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे निवेदन कर्तृत्व या सामाजिक संस्थेतर्फे महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना दिले. निवेदनात म्हटले आहे, सानेगुरुजी वसाहतमधील देशमुख हायस्कूलनजीक मातोश्री प्रमिला सरनाईक पार्क, शिवोदय कॉलनी, द्वारकामाईनगर आदी कॉलनी आहेत. तिथे १०० हून अधिक कुटुंबांचा रहिवास आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत हा भाग येत असून, आजतागायत पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. घरफाळा आकारला जात असून, पाण्यासारखी मूलभूत सुविधा मिळत नाही.कर्तृत्वचे संस्थापक विराज सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच लवकर पाण्याची पाईपलाईन टाकून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी विनीत जिरगे, प्रतीक हेगिष्ट्ये, संजय जाधव, मयुरी पाटील, मंजिरी दाणी, अनुराग गोळे, शिवाजी यादव, तेजस पाटील, बापू पंडित आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Yojana: आता भारताचा भाषिक वारसा संरक्षित होणार! नव्या योजनेची घोषणा, 'ज्ञान भारतम' योजना म्हणजे नेमकी काय?

Video: हेच खरंखुरं स्वातंत्र्य! पुणे महागनर पालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

Latest Marathi News Live Updates : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा,पाहा एकापेक्षा एक सुंदर मॅसेज

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT