कोल्हापूर

विद्यार्थी हेच माझे दैवत ः कुलकर्णी

CD

विद्यार्थी हेच माझे
दैवत ः कुलकर्णी

मुत्नाळला विद्यार्थी, पालकांकडून गुरुजनांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. ३ ः ‘शिक्षकांचे भले बँक बॅलन्स नसेल तरी चालेल. मात्र, अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी निवृत्तीनंतर शिक्षकांना भेटतात, त्यावेळी त्या शिक्षकांना वाटते की, माझ्याएवढा श्रीमंत कोणीही नाही. विद्यार्थी हेच माझे खरे दैवत आहेत,’ असे उद्‍गार गो. म. कुलकर्णी यांनी काढले.
मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित सत्कारप्रसंगी कुलकर्णी बोलत होते. माजी विद्यार्थी मार्तंड जरळी यांनी स्वागत केले. कुलकर्णी म्हणाले, ‘विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी मला सुरुवातीपासूनच समजून घेतले. मला प्रेम दिले. माया दिली. त्यांच्या आपुलकी, सदिच्छेमुळे मी वयाच्या ९५ व्या वर्षीही आनंदी, सुखासमाधानात आहे. याचे संपूर्ण श्रेय येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना जाते.’
पाटील म्हणाले, ‘येथील विद्यार्थी प्रामाणिक असून, कष्ट करण्याची तयारी आहे. माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. याचा अभिमान आहे.’ एल. टी. नवलाज, बसवंत चनवीर, मारुती मुरगी, बापूसाहेब पाटील यांची भाषणे झाली. यल्लाप्पा कांबळे, अरुण पाटील, अक्षय पाटील, केंपाना मुगळी, भीमापा जरळी, सुरेश हुली, संभाजी नाईक, केंपाना जरळी, करबसापा जरळी, संतोष कोळी, उमेश रामजी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. रावसाहेब मुरगी यांनी सूत्रसंचालन केले. रमेश सावंत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: 'काही गोष्ट स्पष्ट करायच्यात, माझ्या दुखापतीबद्दल बोलणारे...' सूर्याने सांगितलं सत्य नेमकं काय? फॉर्मवरही भाष्य

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT