विरोधकांकडे पत्रक काढणे
इतकेच काम : महापौर धातुंडे
इचलकरंजी, ता. ४ ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांचे ऑनलाईन उद्घाटन केले होते. तर प्रत्यक्षात विकासकामांना सुरुवात करण्यापूर्वी भारतीय संस्कृतीप्रमाणे उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला आहे. त्यामुळे याबाबत विरोधकांनी केलेली टीका चुकीची आहे. विरोधकांकडे आता पत्रक काढणे, निषेध नोंदविणे इतकेच काम शिल्लक आहे, असे प्रत्युत्तर महापौर उदय धातुंडे यांच्यासह सत्तारूढ पदाधिकाऱ्यांनी दिले. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहाचे नूतनीकरण, निरामय रिंगरोडची बांधणी करण्याच्या कामांचा उद्घाटन सोहळा आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते झाला होता. पण या कामांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले असताना पुन्हा उद्घाटन केल्यामुळे विरोधकांनी टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज महापालिकेतील सत्तारुढ भाजपच्या पदाधिका-यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापौर धातुंडे म्हणाले, ‘संबंधित विकासकामे सुरु करण्यास अनेक अडचणी आल्या. त्या सोडविण्याचे काम महिनाभर सुरू होते. संस्कृतीप्रमाणे या विकासकामांचे उद्घाटन केले आहे. त्यामध्ये चुकीचे असे काही केलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.