शिंदे अभियांत्रिकीच्या
२६ विद्यार्थ्यांची निवड
गडहिंग्लज, ता. ५ ः भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आयोजित कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळविले. जाबिल सर्किट इंडिया प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्सचे २१ व इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या ५ विद्यार्थ्यांची निवड झाली.
या यशामध्ये विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसह कॉलेजमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्रशिक्षणाचा वाटा आहे. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखत व एचआर मुलाखत अशा विविध टप्प्यांचा समावेश होता. सर्व टप्प्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केली. संस्थेच्या अध्यक्षा ऊर्मिला शिंदे, सचिव स्वाती कोरी, सल्लागार महेश कोरी, प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे, विभागप्रमुख एम. ए. बंदी व ए. एस. बोरगावे, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. शरद लाटकर यांचे मार्गदर्शन मिळाले. निवड झालेल्यांमध्ये अंतिम वर्षाचे विद्यार्थी असून, त्यात आफताब मुल्ला, अंकिता पाटील, अंकिता खराडे, आर्या कांबळे, अश्विनी दोरुगडे, अवधूत आपटे, ज्ञानेश्वरी पाटील, करुणा गोडसे, खुशी कांबळे, कीर्ती तंगडी, मनाली मोटुरे, निखिल मुगलीहळकर, ओंकार कंदर, प्राची गवाडे, प्रज्ज्वल चौगुले, सागर प्रधान, साक्षी पाटील, सानिया जगदाळे, संकेत चिंडके, शिवानंद मुजगोंडा, शुभम कविटकर, तेजस्विनी पाटील, वैष्णवी खराडे, वैष्णवी मळमकर, विनय कटवरे, विश्वजित साळुंखे-पाटील आदींचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.