कोल्हापूर

माकप आंदोलन

CD

३५७७६

खरातच्या संपर्कातील
आमदारांचा राजीनामा घ्या

माकपतर्फे निदर्शनावेळी मागणी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ६ ः नाशिक येथील वादग्रस्त ठरलेल्या शंकर खरात यांच्या संपर्कात राहिलेल्या २९ आमदारांचा राजीनामा घ्यावा; या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आज येथील शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.
मार्क्सवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव म्हणाले की, ‘‘नाशिक येथे मांत्रिक असल्याचे भासवून महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप शंकर खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. अनेक महिलांचे शोषण केल्याचे प्रकरण पुढे येत आहे. राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रूपाली चाकणकर खरात यांच्या संपर्कात होत्या; अशी माहिती पुढे आली आहे. जसा तपास पुढे गेला तसा राज्यातील २९ आमदार कमी अधिक प्रमाणात खरात याच्या संपर्कात होते. अशी माहिती पुढे आली आहे. खरात यांच्यावर महिलांवर अत्याचार केल्याचे गंभीर आरोप आहेत.’’ खरात याच्या संपर्कात असलेल्या आमदारांकडून त्याला अभय होते का; अशी शंका आहे. भविष्यातही खरातला वाचविण्यासाठी प्रयत्न होऊ शकतील, याचा विचार करून आमदारांचे राजीनामे घ्यावेत; अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात येत आहे. असेही श्री. यादव यांनी सांगितले.
शिवाजी मगदूम, शंकर कराळे, विवेकानंद गोडसे, राजेश वरक, आप्पासाहेब परिट, जयवंत शिंदे उपस्थित होते. खरात याच्या संपर्कात असलेल्या आमदारांचे राजीनामे घेण्याच्या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यभर आंदोलन केले आहे. त्याचाच भाग म्हणून कोल्हापुरातही आंदोलन केले आहे; असेही यादव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Election: माघार न घेतल्यास काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव अटळ: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; शरद पवारांनी काँग्रेसला योग्य सल्ला द्यावा!

IPL 2026: CSK संघ का करतोय मोठा संघर्ष? प्रशिक्षक फ्लेमिंग यांनीच सांगितलं खरं कारण; सॅमसनबद्दलही म्हणाले, 'तो अजूनही...

Viral Video: भयानक व्हिडिओ! पनामा कालव्याच्या पुलाजवळ इंधन टँकरचा स्फोट; ४ जण जखमी, एक बेपत्ता

Imran Syed Firing Video : छत्रपती संभाजीनगरात दहशत! शिव्या देत हवेत गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड इम्रान सय्यदचा व्हिडिओ व्हायरल, पाहा काय करतोय?

Secondary Education: माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय! ३८२ शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रोखणार; नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT