

CSK Coach Stephen Fleming Backs Sanju Samson
Sakal
संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्स संघाशी एकरूप होण्याच्या प्रकियेत आहे. त्यामुळे त्याला अजून अपेक्षित सूर सापडलेला नाही, असे सांगत चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी सॅमसनच्या अपयशाची पाठराखण केली आणि लवकरच तो धावांचा पाऊस पाडेल, अशी आशा व्यक्त केली.
टी-२० विश्वकरंडक स्पर्धा गाजवणाऱ्या आणि सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या सॅमसनकडून (Sanju Samson) मोठ्या अपेक्षा आहेत, परंतु या आयपीएलमध्ये राजस्थान संघातून चेन्नईत दाखल झालेल्या सॅमसनला तीन सामन्यांत अनुक्रमे ६, ७, ९ अशाच धावा करता आल्या आहेत.