कोल्हापूर

गड- व्यापारी पतसंस्था

CD

गडहिंग्लज व्यापारी पतसंस्थेला
एक कोटी ९० लाखांचा नफा

गडहिंग्लज ः येथील गडहिंग्लज व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला गेल्या आर्थिक वर्षात एक कोटी ९० लाखांचा ढोबळ, तर एक कोटी ५ लाख ६५ हजारांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ पट्टणशेट्टी व उपाध्यक्ष अरुण तेलंग यांनी दिली. संस्थेचे भागभांडवल १७ लाख २३ हजाराने वाढ होऊन २ कोटी ६८ लाखांपर्यंत पोहोचले आहे. १० कोटी ५८ लाखांचा स्वनिधी आहे. ठेवीमध्ये सात कोटी ४२ लाखांनी वाढ झाली असून, एकूण ठेवी ७३ कोटी ३५ लाखांच्या आहेत. ५० कोटी ६७ लाखांची कर्जे वितरित केली आहेत. शून्य टक्के एनपीएची परंपरा यंदाही कायम राखली आहे. सीआरएआर १७.९८ टक्के आहे. वर्षभरात संस्थेने १२४ कोटी दोन लाखांचा व्यवसाय केला आहे. त्यासाठी संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, सरव्यवस्थापक शंकर वाडेकर यांच्यासह कर्मचारी, अधिकारी, सभासद, ठेवीदार, ग्राहक, कर्जदारांचे सहकार्य मिळाले आहे. संस्थेने ठेवीदार व खातेदारांना सीबीएस सुविधा, लॉकर, एसएमएस, क्यूआर कोड सुविधा दिली आहे. याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करून बॅंकिंग व फायनान्स क्षेत्रातील स्पर्धा, बाजारातील आर्थिक मंदी व बिकट परिस्थितीतून मार्ग काढत सर्वांच्या पाठबळावर संस्थेची ही प्रगती झाल्याचे पट्टणशेट्टी व तेलंग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी कबड्डीचा खेळाडू! इतरांप्रमाणे मलाही न्याय....; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ काय म्हणाले?

Kolhapur Bullock Cart Race : पश्चिम महाराष्ट्रात बैलगाड्यांचा थरार! 82 गाड्यांचा सहभाग; कोल्हापूरच्या 'सतेज-ऋतू' शर्यतीत कोण जिंकला ट्रॅक्टर? वाचा विजेत्यांची यादी

Latest Marathi News Live Update : विधवा, मयत आणि दिव्यांग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा- बच्चू कडू

2G Ethanol Uses : शेतीतील कचऱ्यापासून तयार होणार नवे इंधन! 2G इथेनॉलमुळे शेतकऱ्यांसह कोणकोणत्या क्षेत्राला फायदा?

Pune PMP Bus Service: घराबाहेर पडताच पाच मिनिटांत बस; पीएमपीचे ‘ट्रिपल फाइव्ह’ मॉडेल, वर्षअखेर १७१५ नवीन बस दाखल होणार

SCROLL FOR NEXT