38787
पुणे ः रवळनाथतर्फे मनोज पाटील यांचा सत्कार एम. एल. चौगुले यांच्याहस्ते झाला. शेजारी राजेंद्र पवार, सारंग आवाड, डॉ. आर. एस. निळपणकर, सुहास नाडगौडा आदी.
--------------------------------------------
आर्थिक शिस्तीमुळे ‘रवळनाथ’ची प्रगती
अप्पर पोलिस आयुक्त पाटील ः पुणे शाखेचा तिसरा वर्धापन दिन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ ः ‘आर्थिक शिस्त असलेल्या वित्तीय संस्थाच उत्तम प्रगती करू शकतात. अशा संस्थेत येणारी प्रत्येक व्यक्ती गरजू असते. त्यातूनही योग्य निकष व पारख करून रवळनाथ सेवा देते. ग्रामीण भागातून पुण्यासारख्या मोठ्या शहरापर्यंत झालेली रवळनाथची प्रगती आर्थिक शिस्तीमुळेच झाली आहे’, असे मत पुण्याचे अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केले.
रवळनाथ को-ऑप. हाउसिंग फायनान्स सोसायटीच्या पुणे (कोथरूड) शाखेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई महावितरणचे एचआर संचालक राजेंद्र पवार, पिंपरी-चिंचवडचे अप्पर पोलिस आयुक्त सारंग आवाड प्रमुख उपस्थित होते. रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते.
राजेंद्र पवार म्हणाले, ‘घर व त्यासाठीचे कर्ज हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सामान्यांना हक्काचे घर उभारण्यासाठी एकाचवेळी पैसे उभारणे शक्य नसते. अशावेळी रवळनाथ संस्था सुलभ कर्ज सुविधा देते. त्यामुळे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होते.’
फिटनेस स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल साक्षी छाजेड, पुरस्कार मिळाल्याबद्दल सल्लागार डॉ. राजेंद्रप्रसाद शिंदे यांचा सत्कार झाला. शाखाध्यक्ष सुहास नाडगौडा यांनी स्वागत केले. रवळनाथचे अध्यक्ष डॉ. आर. एस. निळपणकर यांनी प्रास्ताविक केले. शाखा सल्लागार डॉ. शिंदे, डॉ. श्रीकांत मुसळे, रेखा दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. रिना जुगळे यांनी आभार मानले. यावेळी सतीश भिडे, संतोष डोख, विठ्ठल जाधव, सागर पावसे, सुरेश भोसले, संजय कुरुंदकर, कैलास पिंगळे, नंदकुमार भोसले, दिलीप वेल्हाणकर, प्रणोती नाडगौडा, हेमंत बागडे, दशरथ बच्चे, संजय पाटील, शाखाधिकारी श्रेयस गाडवे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.