कोल्हापूर

अलमट्टी धरण उंचीवाढीला ‘सिटीझन फौरम’चा विरोध

CD

39535

आलमट्टीच्या उंचीवाढीला
‘सिटीझन फोरम’चा विरोध
पाटबंधारे विभागाला निवेदन; पूरपरिस्थिती टाळण्यासाठी हस्तक्षेपाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा कर्नाटक सरकारने घाट घातला आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह पश्र्चिम महाराष्ट्रात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण होणार आहे. याबाबत राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन केंद्र सरकार, जलआयोग, संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन ‘सिटीझन फोरम’तर्फे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे यांना दिले.
आलमट्टी धरणातील अतिरिक्त पाणी साठ्यामुळेच या भागात वारंवार पूरस्थिती उद्‌भवत आहे. आयआयटीच्या तज्ज्ञ समितीनेही धरणांमुळे पूरस्थिती गंभीर होत असल्याचा निष्कर्ष काढल्याचा दावा फोरमतर्फे केला आहे.
निवेदनात म्हटले आहे, आलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढविण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न असून, यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी नसतानाही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या निर्णयामुळे भविष्यात महाभयंकर पूरस्थिती निर्माण होऊ शकते. महाराष्ट्र शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन केंद्र सरकार, जलआयोग व संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेती, उद्योग व नागरी वस्तीला फटका बसण्याची शक्यता आहे. यावेळी फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव, वैभवराज राजेभोसले, संजय घाटगे, राजेंद्र थोरावडे, गौरव लांडगे, राहुल फल्ले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: 16 चौकार, 9 षटकार... KL Rahulचे दीडशतक! १९ वर्षात कोणत्याच भारतीयाला न जमकलेला पराक्रम, Orange Cap ही मिळवली

Junnar Association: जुन्नर शिवनेर खते-बियाणे औषध विक्रेते असोसिएशन अध्यक्षपदी प्रवेश देवकर यांची बिनविरोध निवड

Gautam Adani: गौतम अदानींच्या संपत्तीत जबरदस्त उसळी! 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये एन्ट्री; 'या' उद्योगपतीला दिली टक्कर

IPL 2026, RR vs SRH: सनरायझर्स हैदराबादने अचानक कर्णधार बदलला! नवा कॅप्टन टॉस जिंकून ईशान किशनबद्दल काय म्हणाला?

Police Recruitment : जुन्नरच्या अतिदुर्गम देवळे गावातील शेतकरी कुटुंबातील वैशाली शेळकेची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निवड

SCROLL FOR NEXT