IPL 2026, RR vs SRH: सनरायझर्स हैदराबादने अचानक कर्णधार बदलला! नवा कॅप्टन टॉस जिंकून ईशान किशनबद्दल काय म्हणाला?

Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad: आयपीएल २०२६ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघात ३६ वा सामना होत आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार बदलला आहे.
Sunrisers Hyderabad | IPL 2026

Sunrisers Hyderabad | IPL 2026

Sakal

Updated on

RR vs SRH Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत शनिवारी (२५ एप्रिल) दोन सामने होत असून दुसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होत आहे. हा सामना राजस्थानच्या घरच्या मैदानात जयपूरला होत आहे.

दरम्यान, या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) मोठा बदल केला. हैदराबाद संघात त्यांचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) दुखापतीतून सावरून काही दिवसांपूर्वीच दाखल झाला आहे. त्यानंतर आता त्याने या सामन्यातून पुनरागमन केले आहे. तो परत आल्याने आता त्याने हैदराबाद संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही हाती घेतली आहे.

Sunrisers Hyderabad | IPL 2026
IPL 2026 : मुंबई इंडियन्स कर्णधारपदावरून हार्दिक पांड्याची हकालपट्टी केव्हा करणार? दिग्गज खेळाडूचा थेट सवाल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com