

KL Rahul | DC vs PBKS | IPL 2026
Sakal
DC vs PBKS Marathi News: आयपीएल २०२६ स्पर्धेत ३५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर पंजाब किंग्सचे आव्हान आहे. अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी (२६ एप्रिल) होत असलेल्या सामन्यात दिल्लीसाठी केएल राहुल आणि नितीश राणा यांनी स्फोटक फलंदाजीने मैदान गाजवलं असून या हंगामातील सर्वोच्च धावसंख्याही गाठून दिली. केएल राहुलने दीडशतक करताना अनेक विक्रम नावावर केले आहेत.
या सामन्यात दिल्लीने २० षटकात २ बाद २६४ धावा केल्या. केएल राहुलने (KL Rahul) ६७ चेंडूत १६ चौकार आणि ९ षटकारांसह १५२ धावांची नाबाद खेळी केली. त्याने ४७ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले होते. तसेच नितीश राणाने ४४ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांसह ९१ धावांची खेळी केली. या दोघांमध्ये २२० धावांची दुसऱ्या विकेटसाठी भागीदारीही झाली.