40014
मेहता पब्लिशिंग हाऊसच्या
ग्रंथदालनाचे उद्घाटन
कोल्हापूर, ता. २७ ः मेहता पब्लिशिंग हाऊसच्या येथील सुसज्ज ग्रंथदालनाचे उद्घाटन खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते झाले. हे ग्रंथदालन कोल्हापूरच्या वाचन चळवळीच्या वैभवात मोलाची भर घालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजारामपुरी पाचव्या गल्लीतील जयश्री हाईट्समध्ये हे दालन साकारले आहे. यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अखिल मेहता, साहिल मेहता, रूपा मेहता, नुपूर मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील वाचन चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या निवडक ग्रंथालयांचा आणि वाचकांचा पुस्तक भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
आपटे वाचन मंदिर (इचलकरंजी), रसिक रंजन ग्रंथालय (घुणकी), पूज्य साने गुरुजी वाचनालय (गडहिंग्लज), तरुण भारत वाचनालय (आरदाळ) आणि जिल्हा परिषद विद्यामंदिर (सडोली दुमाला) या संस्था व शाळांसह एस. आर. कामत, प्रकाश आमते, राजेंद्र घोडके, उत्तम तलवार, प्रा. श्रीकांत नाईक या वाचकांचा गौरव झाला.
मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठी प्रकाशनात प्रथमच राबवलेली ‘चेन स्टोअर’ची अभिनव संकल्पना पुण्यानंतर आता कोल्हापुरात विस्तारली आहे. या दालनात वाचकांना एकाच छताखाली तीन हजारांहून अधिक स्वतंत्र शीर्षके उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये अभिजात मराठी साहित्यासोबतच जागतिकस्तरावरील दर्जेदार अनुवादित पुस्तकांचा खजिना रसिकांसाठी खुला झाला आहे. संस्थेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यासाठी वाचकांसाठी आणि ग्रंथालयांसाठी विशेष सवलतींची योजनाही जाहीर केली आहे. प्रतीक येतावडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.