40047
गडहिंग्लज ः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ जनसंवाद कार्यक्रमास उपस्थित समरजितसिंह घाटगे, राजेंद्र तारळे, रवींद्र घोरपडे, सुनील गुरव आदी.
------------------------------------
पंतप्रधानांच्या ‘मन की बात’
जनसंवाद कार्यक्रमास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी साधलेल्या संवादाला कागल-गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघात प्रतिसाद मिळाला. मतदारसंघातील विविध शहरांसह ग्रामीण भागात भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्रितपणे हा कार्यक्रम पाहिला.
येथील कार्यक्रमास शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे, राजे बँकेचे उपाध्यक्ष रवींद्र घोरपडे, सुनील गुरव, संजय बटकडली, गणपतराव डोंगरे, शहराध्यक्ष संदीप कुरळे, नगरसेविका अनिता खोत, सचिन घुगरी, अर्चना रिंगणे, निलांबरी भुईंबर आदी उपस्थित होते. कागल दूधगंगा डेअरीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात अखिलेशराजे घाटगे, शाहूचे संचालक सतीश पाटील, शहराध्यक्ष यशवंत माने व नगरसेवक उपस्थित होते.
सिद्धनेर्ली येथे वीरेंद्रसिंह घाटगे, पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील, शाहू कृषीचे अध्यक्ष रामचंद्र वैराट, राजे बँकेचे संचालक राघू हजारे, शाहू कृषीचे संचालक रमेश कांबळे सहभागी झाले होते.
सेनापती कापशीत शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, पंचायत समिती सदस्या सुनीता माळी, राजे बँकेचे संचालक प्रकाश पाटील, तुकाराम भारमल, मिलिंद देशपांडे उपस्थित होते. आणूरला जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. मुरगूडला दिग्विजयसिंह पाटील, राजे बँकेचे संचालक दत्ता खराडे, अनंत फर्नांडिस, विलास गुरव, बिद्री येथे संभाजी फराकटे, राजे बँकेचे संचालक संजय पाटील, संदेश पाटील, बाळासाहेब वारके, एम. एम. चौगुले उपस्थित होते. नानीबाई चिखली, उत्तूर, भादवण येथेही प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमातून मांडलेले राष्ट्रहित, समाजप्रबोधन आणि विकासाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.