कोल्हापूर

जनगणनेत घरांची वाढ समोर

CD

महापालिका फोटो
--
घरगणनेत ४६ हजार मिळकती ‘बेपत्ता’
घरफाळा विभागाकडे नोंद नाही; वेगवेगळ्या कारणांनी घरफाळा बुडीत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः महापालिकेला एक लाख ७१ हजार मिळकतींकडून घरफाळा मिळत असला तरी तब्बल ४६ हजारांवरील मिळकतींची नोंद घरफाळा विभागाकडे नाही. सध्या सुरू असलेल्या जनगणनेतील घर गणनेतून ही बाब उघड झाली. त्यात दोन लाख १७ हजारांवर मिळकतींची नोंद झाली आहे. या पाठीमागे कारणे वेगवेगळी असली तरी त्यातून महापालिकेचा घरफाळा मात्र बुडत आहे.
महापालिकेतर्फे शहरातील जनगणनेतील घरांची गणना करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यात दोन लाख १७ हजार ४४० वर मिळकतींची संख्या पोहोचली आहे. प्रत्येक गटात किमान १८० व २०० पर्यंत घरांची नोंद झाली आहे. याप्रकारे १२०१ गट तयार केले आहेत. यात स्वतंत्र बंगले, घरे, अपार्टमेंटमधील फ्लॅट याबरोबरच झोपडी, शेड, केबीनही धरल्या आहेत. पक्क्या बांधकामाबरोबर कच्ची बांधकामांचीही मोजणी केली आहे. ही मोजणी पाहिल्यानंतर कमीत कमी ४६ हजारांवरील मिळकतींची नोंद घरफाळा विभागाकडे नसल्याचे स्पष्ट होत आहे. या मिळकतींचा घरफाळा जमा होत नाही..
.....
कोट
अनेकजण एका इमारतीतच स्वतंत्र राहात असले तरी विविध कारणांनी अनेकांचा घरफाळा स्वतंत्र झालेला नाही. त्यामुळे घरफाळ्यात एक मिळकत दिसत असली तरी या जादा घरांची नोंद होऊ शकते. त्यातून ही संख्या वाढलेली असू शकते.
- सुधाकर चल्लावाड, करनिर्धारक
.....

दृष्टिक्षेपात
- घर गणनेसाठी शहरात - १२०१ गट
- एका गटात १८० ते २०० मिळकती (निवासी, रहिवास, व्यावसायिक, औद्योगिक सर्व)
- एका गटाला - १ प्रगणक
- सहा गटांना १ पर्यवेक्षक
- एकूण १३२६ प्रगणक व २२१ पर्यवेक्षक
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये दमदार पावसाची हजेरी

Forest Crackdown: सुधागडात खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत

SCROLL FOR NEXT