कोल्हापूर

सातारा अपघात

CD

साताऱ्याजवळ टेंपो उलटून
मायलेकींसह चौघे ठार
सातारा, ता. ८ : कामथी तर्फ परळी (ता. सातारा) गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री झालेल्या टेंपो अपघातात चार जण ठार झाले. मृतात मायलेंकीसह दोघांचा समावेश आहे. मालन सीताराम अडागळे (वय ६०) व लीलाबाई उत्तम अडागळे (रा. कामथी, परळी), कल्पना सागर आवळे (वय ३५, सुरुर-कवठे, ता. वाई), गार्गी सागर आवळे (वय ६, रा. कवठे, ता. वाई) अशी मृतांची नावे आहेत. कामथी (परळी) येथील एका कुटुंबाचे पुनर्वसन निमसोड (ता. खटाव) येथे झाले आहे. तेथे जाण्यासाठी कुटुंब निघाले होते. रात्री कामथी येथील घरातील साहित्य टेंपोत भरल्यानंतर चार म्हशी टेंपोत घेतल्या. हा टेंपो उतारावर उभा होता. टेंपो चालक केबिनमध्ये असणारे साहित्य टपावर ठेवत असतानाच टेंपोच्या हौद्यातील जनावरांनी हालचाल केली. त्यामुळे उतारावरील टेंपो हलला आणि उतारावरून पुढे गेला. टेंपो उताराने पुढे जाऊन रस्त्याकडेच्या खड्ड्यात उलटला. त्यामुळे जनावरे आणि आतील साहित्याच्या ओझ्याखाली आतमधील सर्वजण दबले. अपघाताच्या आवाजाने ग्रामस्थांनी धाव घेऊन मदतकार्य केले. जखमींना बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे चौघे मरण पावल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT