कोल्हापूर

गड- रवळनाथ संस्था

CD

42845
गडहिंग्लज ः रवळनाथमधील प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना अविनाश शिंत्रे. व्यासपीठावर एम. एल. चौगुले, डॉ. आर. एस. निळपणकर, डी. के. मायदेव, प्राची मायदेव आदी.
------------------------
सहकारी संस्थांनी अद्ययावत
तंत्रज्ञानाची जोड द्यावी ः शिंत्रे

‘रवळनाथ’मध्ये संचालक, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ ः ‘विश्वासाच्या बळावर चाललेल्या सहकारी संस्थांना स्पर्धेत टिकून राहून प्रगती करावयाची झाल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञान व डिजिटायझेशनचा वापर करणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन कोल्हापूरचे अविनाश शिंत्रे-गुंडाळे यांनी केले.
श्री रवळनाथ को-ऑप. हाउसिंग फायनान्स सोसायटी व श्री महालक्ष्मी वुमेन्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने संचालक व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण झाले. यावेळी ‘बॅंकिंगचा नवा चेहरा ः तंत्रज्ञान की मनुष्यबळ’ या विषयावर शिंत्रे बोलत होते. रवळनाथचे संस्थापक एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. रवळनाथचे अध्यक्ष डॉ. आर. एस. निळपणकर, महालक्ष्मी सोसायटीच्या अध्यक्षा प्राची मायदेव प्रमुख उपस्थित होते.
चौगुले म्हणाले, ‘संस्थेच्या प्रगतीत कर्मचारी महत्त्वाचा घटक आहे. प्रशिक्षित व तंत्रस्नेही कर्मचारीच ग्राहक व सभासदांना उत्तम सेवा देऊ शकतात. त्यामुळे असे प्रशिक्षण वेळोवेळी संस्था देत असते. कर्मचाऱ्यांनीही स्वतः अद्ययावत बनावे.’ यावेळी डॉ. निळपणकर यांचेही भाषण झाले.
दरम्यान, सोनेतारण कर्ज प्रकरणातील दागिन्यांची तपासणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले. थकबाकी वसुलीचा आढावा घेण्यात आला. रवळनाथचे सीईओ डी. के. मायदेव यांनी स्वागत केले. अध्यक्ष डॉ. निळपणकर यांनी प्रास्ताविक केले. गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचालन केले. प्रशासन अधिकारी प्रज्ञा पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. व्यवस्थापक अशोक सुळकुडे यांनी आभार मानले. यावेळी संचालक डॉ. दत्तात्रय पाटील, महेश मजती, मीना रिंगणे, राजश्री कोले, मनोहर गुरबे, श्रद्धा निळपणकर, अलका आरबोळे, ममता मजती, संपदा चौगुले, नंदा गुरबे आदी उपस्थित होते.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

Anna Hazare Praises Tukaram Mundhe : "अशा डॅशिंग अधिकाऱ्यांची देशाला गरज"; तुकाराम मुंढेंच्या 'त्या' धडक मोहिमेवर अण्णा हजारे खूश, केलं तोंडभरुन कौतुक

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्याकांत प्रकरणात सियाच्या दोन मैत्रीणींकडेही चौकशी होणार

सरकारी रुग्णालयात प्रसुती झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी, राज्य सरकारचा मोठा निर्णय...

TrashBot : बारावीच्या विद्यार्थिनीने बनवला अद्भुत 'ट्रॅशबॉट' रोबो; कचरा बघताच पळत जाऊन करतोय साफसफाई, पाहून तुमचं डोकं चक्रावेल

SCROLL FOR NEXT