कोल्हापूर

कलेच्या माध्यमातून चंदगडच्या संस्कृतीचे जतन

CD

01113
कार्वे ः येथे चंदगडी नाट्य महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी दीपप्रज्वलन अभिनेते प्रसाद पंडित यांनी केले. आमदार राजेश पाटील आदी उपस्थित होते.
--------
कलेच्या माध्यमातून चंदगडच्या संस्कृतीचे जतन
आमदार राजेश पाटील ः चंदगडी नाट्य महोत्सवाचा प्रारंभ, अभिनेते प्रसाद पंडित यांची उपस्थिती

कोवाड, ता. २३ ः चंदगड तालुक्याला नाट्य कलेची परंपरा लाभली आहे. अनेक नामवंत कलाकार या मातीत घडले आहेत. येथील रसिक प्रेक्षक कलेला मनापासून दाद देणारा आहे. त्यामुळे चार वर्षे चंदगडी नाट्य महोत्सवाचा प्रगतीचा आलेख उंचावत आहे. कलाक्षेत्राच्या माध्यमातून चंदगडची संस्कृती जतन करण्यासाठी सुरु असलेला जागर, नक्कीच भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त करुन आमदार राजेश पाटील यांनी नाट्यगृहासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे. लवकरच चंदगडला भव्य नाट्यगृह उभे राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्वे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले विद्यालयाच्या पटांगणावर श्री साई नाट्यधारा मंडळ व प्रोसेस इन थिएटरतर्फे पाचव्या चंदगडी नाट्य महोत्सवाला शुक्रवार (ता. २१) पासून सुरवात झाली. आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते नाट्यमहोत्सवाचा प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी एम. एम. तुपारे होते. प्रसिद्ध सिनेअभिनेते प्रसाद पंडित उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘चंदगड तालुक्यातील प्रत्येक गावात सण, उत्सव, जत्रा किंवा यात्रेच्या माध्यमातून कलाकारांनी आपल्या कसदार अभियानावर कलांचे जतन केले आहे. नाट्यसंस्कृती वृध्दिंगत करणारे हे सोहळे नाटकाच्या माध्यमातून समाजाचे वास्तव लोकांसमोर आणून नव्या पिढीला दिशा देण्याचे काम करतील.’
सिनेअभिनेते प्रसाद पंडित म्हणाले, ‘नाटकाच्या दहा बाजू आहेत. त्यामध्ये प्रेक्षक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. रसिक प्रेक्षकांच्या प्रतिसादावर नाटकाची उंची वाढत असते आणि चेष्टा करण्यावर नाटक खाली पडत असतं. त्यामुळे नाटक तारणं किंवा मारणं हे प्रेक्षकांच्या हातात आहे. नाटकाला तारण्याची जबाबदारी प्रेक्षकांच्यावर आहे.’ परसू गावडे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य एम. एम. गावडे, दयानंद काणेकर, सुनिल काणेकर, निवृत्ती हारकारे, संतोष घोळवे, एस. वाय. प्रभू, प्राचार्य श्रीकांत पाटील, सरपंच शिवाजी तुपारे, पांडूरंग बेनके, आर. आय. पाटील, एस. बी. गुरबे, आर. पी. पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT