कोल्हापूर

कोवाड - हत्ती

CD

01884
कौलगे ः येथे रविवारी सायंकाळी जंगलातून हत्ती गावात आला.
...
हत्ती कौलगेतून कर्नाटकातील अतिवाडच्या हद्दीत
वनविभागाची धावपळः सीमाभागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोवाड, ता. ३ ः महिपाळगडाच्या जंगलात स्थिरावलेला हत्ती रविवारी सायंकाळी बाहेर पडला. तब्बल पाच दिवसानंतर हत्तीने जागा सोडल्याने वनविभागाची धावपळ सुरु झाली आहे. रात्री उशिरापर्यंत हत्तीला जंगलात घालविण्याचा प्रयत्न केला, पण सर्वांनाच चकवा देऊन हत्तीने कौलगे गावाच्या हद्दीतून कर्नाटकातील अतिवाड गावाच्या हद्दीत प्रवेश केला होता. रात्री नऊ वाजल्यानंतर हत्तीचे दर्शन झाले नसल्याने वनविभागाने सीमाभागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हत्तीच्या मागावर असलेल्या वनविभागाची रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरु होती. आलेल्या मार्गाने हत्तीला पाठविण्याचे प्रयत्न असल्याने वनविभागाची रात्रीही शोध मोहीम सुरु राहणार आहे.
गेल्या पाच दिवसांपासून हत्तीने महिपाळगडाच्या जंगलात मुक्काम केला होता. गुरुवारी कर्नाटकातील गावातून हत्तीने धुडगूस घातल्याने सीमाभागातील लोकांच्यात हत्तीची भिती निर्माण झाली आहे. शुक्रवारपासून हत्ती जंगलात स्थिरावला होता. जंगल परिसरात पुरेसे खाद्य नसल्याने हत्तीला आलेल्या मार्गाने घालविण्याचे नियोजन वनविभागाने केले होते. त्यामुळे शनिवारी रात्रीपासून वनविभागाचे कर्मचारी हत्तीच्या मागावर होते. रविवारी सायंकाळी साडे सहा वाजता हत्ती जंगलातून कौलगे गावाच्या हद्दीत आला. नाईक यांच्या शेतातील पाण्याच्या डबक्यात तो लोळून पु्न्हा जंगलात गेला. आठ वाजता हत्तीने होसूर ते बेळगांव मार्ग ओलांडून कर्नाटकातील अतिवाड गावाच्या हत्तीत प्रवेश केला होता. वनविभागाने होसूर गावाच्या बाजून शोध मोहीम सुरु केली. पण पुन्हा नऊ वाजता हत्तीने अतिवाड हद्दीतून होसूरकडे मोर्चा वळविला आहे. वनविभागाने रात्रभर शोध मोहीम सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी रात्रीच्या अंधारात हत्ती दिसत नव्हता. त्यामुळे होसूर, किटवाड, कुदनूर येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. उसाला पाणी देण्यासाठी रात्री शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना घरी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण हत्तीची नेमकी दिशा समजत नसल्याने वनविभागाचे कर्मचारीही गोंधळात पडले होते.
...
‘हत्तीने रात्री जंगल सोडल्याने रात्रभर शोध मोहीम सुरु ठेवणार आहे. शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांना सूचना दिल्या आहेत. हत्तीला आलेल्या मार्गाने पाठविण्याची मोहीम सुरु केली आहे. पण रात्री दहा वाजेपर्यंत हत्तीची दिशा सापडत नसल्याने मोहीमेला अडथळा आला आहे.
जे. आर. डिसोझा, वनपाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात मुसळधार! शाळा पाण्यात, रस्त्याचं काम वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका; पाणीच पाणी

Mumbai Local: मुंबई लोकलला प्रवाशांमुळे उशीर, रेल्वे प्रशासनाचा दावा; नेमकं प्रकरण काय?

Thane Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, शाळेसमोरच सुरू होता प्रकार; ५ तरुणींची सुटका; दोघांना अटक

फाळणीची जखम आणि आशेचा किरण! प्रीती झिंटा अन् सनी देओलच्या 'बटवारा १९४७' चित्रपटाची पहिली झलक

Latest Live Updates Marathi : मुसळधार पाऊस, नागपूर खंडपीठातील वकिलांच्या दालनासमोर साचलं पावसाचे पाणी

SCROLL FOR NEXT