कोल्हापूर

कोवाड - एटीएम चोरी

CD

एटीएम फोडण्यास वापरलेल्या
गॅस कटरची बेळगावातून खरेदी
संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज हाती?
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ७ ः स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे येथील एटीएम मशीन गॅस कटरने फोडून १८ लाख ७७ हजार ३०० रुपयांची रोकड लुटण्यात आली. हा प्रकार शनिवारी रात्री घडला. चोरट्यांनी मशीन फोडण्यासाठी वापरलेले गॅस कटर बेळगावमधून खरेदी केल्याची खात्रीलायक माहिती आता पोलिसांच्या हाती लागली. त्यामुळे तपासाला गती आली आहे.
चोरट्यांची आंतरराज्य टोळी असल्याने चंदगड, कोल्हापूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आदींची चार पथके राजस्थान, बंगळूर, मुंबई व बेळगावला रवाना झाली आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून चोरटे मुंबईहून बेळगावला आल्याचे निष्पन्न झाले आहे. बेळगावमधून त्यांनी गॅस कटर खरेदी केल्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. त्याअनुषंगाने बेळगावमधील त्यांचा वावर व त्यांच्या हालचालींची माहिती घेण्यासाठी चंदगड पोलिसांचे पथक रात्रंदिवस काम करत आहे. तपासात चोरट्यांचा वावर असलेल्या अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.
चोरट्यांनी कोवाडमधीलचं एटीएम फोडण्यासाठी का निवडले, अशी चर्चा सुरू असल्याने गूढ वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक पातळीवरही तपासावर भर दिला आहे. चोरीच्या घटनेनंतर चोरट्यांनी निट्टूर, मलतवाडी, सांबरे, हडलगे मार्गे प्रवास केल्याने चोरीच्या पूर्वी त्याची रेकी केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे चोरट्यांना स्थानिक पातळीवरून काही टिप्स मिळाल्यात का याचीही चौकशी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: 'काही गोष्ट स्पष्ट करायच्यात, माझ्या दुखापतीबद्दल बोलणारे...' सूर्याने सांगितलं सत्य नेमकं काय? फॉर्मवरही भाष्य

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT