कोल्हापूर

शिव महोत्सव

CD

12712
...

शिवछत्रपतींचे विचार समाजात रूजवा

संयोगिताराजे छत्रपतीः ''शिव महोत्सव'' मान्यवरांचा सन्मान

कोल्हापूर, ता. २२ : ‘शिवछत्रपतींचे विचार समाजात रूजविण्यासाठी बालमनावर संस्कार घडवा’, असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठ आजी- माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीतर्फे आयोजित ''शिव महोत्सव'' रंगारंग संस्कृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रम झाला.
संयोगिताराजे म्हणाल्या, ‘आजच्या काळात शिवरायांचे विचार पुढे न्यायला हवेत. त्यांच्यासारखे मुलांना घडवायचे असेल तर मुलांवर चांगले संस्कार देण्याची जबाबदारी पालकांची आहे. आता सर्वसामान्यांना ज्ञानाचे दरवाजे उघडे झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.’
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, ‘‘ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी समाज परिवर्तनाचे कार्य केले आहे. वाचन, लेखन व चिंतनातून ते समाज प्रबोधन करत आहेत. समाजात बदल घडवायचा असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही.’ या वेळी स्वराज्य अकॅडमीने नृत्य सादर केले. शाहीर रामानंद उगले यांनी पोवाडा सादर केला. श्रध्दा शुक्ल यांनी लावणी सादर केली. गायक अंशिका चोणकर, कबीर नाईकनवरे, राजू नदाफ यांनी सुरांची मेजवानी दिली.
या प्रसंगी उमेद फाऊंडेशनला आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. निमाताई ढमाले यांना ''जिजाऊ शिव प्रेरणा पुरस्कार'' आणि सारिका पाटणकर यांना ''शिव ताराराणी'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर, मंदार पाटील, सागर बगाडे, आझाद नायकवडी उपस्थित होते. सत्यजीत कोसंबी यांनी सूत्रसंचालन केले.
------------

डॉ. आ. ह. साळुंखे यांनी
साधला ऑनलाईन संवाद

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना यंदाचा ''शिव जीवनगौरव पुरस्कार'' जाहीर करण्यात आला. प्रकृती अस्वस्थामुळे ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी ऑनलाईन संवाद साधला. शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT