कोल्हापूर

मराठा आरक्षण

CD

आरक्षणप्रश्नी लवकरच सकल मराठा
समाजाचा मेळावा घेण्याचा निर्णय

कोल्हापूर, ता. २३ : आरक्षणप्रश्नी लवकरच सकल मराठा समाजाचा मेळावा घेण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीत आज झाला. राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
मुळीक म्हणाले,"तातडीने दुरूस्ती याचिका दाखल करून सरकारने प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. या कालावधीत ओबीसीप्रमाणे अन्य सवलती लागू कराव्यात‌. नवीन आयोगातर्फे पुन्हा सामाजिक शैक्षणिक व आर्थिक पातळीवर अहवाल तयार होताना बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात मराठ्यांसह सर्व जातीय जनगणना तातडीने झाली पाहिजे"
मराठा आरक्षणाची नुकतीच सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने पुर्नविचार याचिका फेटाळली आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील सर्वसामान्य दुर्बल घटकातील मराठा तरुणांचा भ्रमनिरास झाला असून, मराठा समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे. इतर समाजाचे प्रश्न हाताळताना सर्वच पक्ष ताकदीने प्रयत्न करत असतात‌. मराठा आरक्षणासारख्या प्रश्न ज्या गांभीर्याने घेतला पाहिजे, तसा कोणताही पक्ष घेत नाही. त्या बाबतीत सर्वच पक्ष उदासीन आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे‌, अशा भावना प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शंकरराव शेळके, उत्तम जाधव, प्रकाश पाटील, चंद्रकांत चव्हाण, विजय काकोडकर, उदय देसाई, राजू परांडेकर, इंद्रजित माने, प्रतीक साळुंखे, मनोज नरके, संतोष धनवडे, शरद साळुंखे, गुरुदास जाधव, मदन बागल, अवधुत पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT