कोल्हापूर

राजेंद्र नगर येथे इमारतीवरून उडी मारल्याने एकाचा मृत्यू

CD

पोलिस छाप्यावेळी इमारतीवरून उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू

राजेंद्रनगर येथील घटना, एक जखमी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : पोलिस कारवाईच्या भितीने जुगार खेळणाऱ्या दोन तरुणांनी इमारतीवरून उडी मारल्याने डोक्यावर पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला; तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. राजेंद्रनगरमध्ये आज रात्री अकराच्या सुमारास घटना घडली. साहिल मायकल मिणेकर (वय २६, रा. राजेंद्रनगर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे, तर दत्तात्रय देवकुळे हा गंभीर जखमी आहे.
याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्रनगर येथील एका दुमजली इमारतीमध्ये काही तरुण रविवारी रात्री जुगार खेळत होते. अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी तेथे छापा टाकला. पोलिसांना पाहताच तरुणांची पळापळ झाली. कारवाईच्या भितीने साहिल आणि दत्तात्रय या दोघांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यावेळी दगडावर डोके आपटल्याने साहिलचा जागीच मृत्यू झाला, तर दत्तात्रय जखमी झाला. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह ‘सीपीआर’मध्ये आणण्यात आला; तर दत्तात्रय याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. साहिल हा खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
---------------
‘सीपीआर''मध्ये गर्दी, पोलिस बंदोबस्त
साहिलचा मृत्यू झाल्याचे कळताच राजेंद्र नगरमधील तरुणांनी आणि नातेवाईकांनी सीपीआरच्या आवारात गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीयांनी येथे हंबरडा फोडला. गर्दीत वाढ झाल्याने शवविच्छेदन विभागाच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सतीश गुरव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT