कोल्हापूर

ए एस ट्रेडर्स महिलेस अटक

CD

24284

...
ए. एस. ट्रेडर्समध्ये ॲडमिन
म्हणून काम पाहणाऱ्या महिलेस अटक

कोल्हापूर, ता. १८ : ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एलएलपी या कंपनी व उपकंपनीतील ॲडमिन म्हणून काम पाहणाऱ्या महिलेस आज अटक करण्यात आली. श्रुतिका वसंत सावेकर-परीट (वय ३२, रा. प्लॉट नंबर ४०३, गुरुप्रसाद हाईट्स, नागाळा पार्कजवळ, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज ही कारवाई केली. गुन्हे दाखल झालेल्या २७ संशयित आरोपींपैकी श्रुतिका ही अटक झालेली सहावी व्यक्ती आहे, अशी माहिती निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी दिली.
कमी कालावधीत जादा परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या एकूण २७ जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत असून तपासात प्रगती होईल, त्यानुसार एक एक संशयित आरोपीला अटक केली जात आहे. यातील श्रुतिका सावेकर हिने ए. एस. ट्रेडर्स आणि तिच्या उपकंपन्यांमध्ये संचालक व इतरांशी संगनमत करून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले व कंपनी बंद करून फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने आज तिला अटक करण्यात आली. उद्या (ता.१९) तिला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड, उपनिरीक्षक दिलीप कारंडे, सहायक फौजदार राजू वरक, रवी पाटील, दीपक सावंत, राजेश बरगाले, दिनेश उंडाळे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT