काही लोक येथे जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कोल्हापूर : कसबा बावड्यातील सामाजिक शांतता बिघडवणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, बावडा परिसराला ऐतिहासिक वारसा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ही जन्मभूमी आहे. बावड्यातील सर्व जाती धर्मातील लोक सुखाने गुण्यागोविंदाने रहात आहेत. मात्र, काही लोक येथे जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. पोलिसांनी तातडीने तपास करून संशयितांना अटक करावी.तसेच बावड्यातील सर्व कार्यकर्त्यांनी जातीय सलोखा टिकविण्यासाठी व शांतता अबाधित राखण्यासाठी दक्ष राहावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.