18610 सेजल सुतार
18611 सई येवलुस्कर
..............
महिला साखळी क्रिकेट स्पर्धेत
कोल्हापूर जिल्हा संघ विजेता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे सुरू असलेल्या निमंत्रित वरिष्ठ महिला एकदिवसीय साखळी क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने सातारा संघावर ६२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पुणे येथील धानोरीतील किंग्ज स्पोर्टस् मैदानावर सामना झाला.
कोल्हापूर जिल्हा संघाने प्रथम फलंदाजी करताना ४० षटकांत सर्व गडी गमावून १६० धावा केल्या. कार्तिकी चव्हाणने २९, सई यवलुस्करने २७, संजना वाघमोडेने नाबाद २१, साक्षी पोतदारने १७ तर सुदीक्षा देसाईने ११ धावांचे योगदान दिले. सातारा संघाकडून भूमिका फाळके व तेजश्री ननवरे यांनी प्रत्येकी दोन, तर समृद्धी बनवणे, शांभवी देशमुख, आदिती जाधव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
उत्तरादाखल खेळताना सातारा जिल्हा संघाचा डाव ३० षटके व दोन चेंडूंत ९० धावांवर आटोपला. त्यांच्या भूमिका फाळकेने ४४ धावांची झुंजार खेळी केली, तर समृद्धी बनवणे व वैदेही जोशी यांनी प्रत्येकी १० धावा केल्या. कोल्हापूरकडून सई यवलुस्करने भेदक मारा करत चार, सेजल सुतारने तीन व मधुरा इंगवलेने एक गडी बाद केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.