कोल्हापूर

शेतीत आधुनिकतेसाठी प्रदर्शनाची गरज

CD

03303
कुरुंदवाड ः येथील यात्रेच्या बक्षिस वितरण प्रसंगी बोलताना आदित्य पाटील यड्रावकर. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.
----------
शेतीत आधुनिकतेसाठी प्रदर्शनाची गरज
आदित्य पाटील यड्रावकर; कुरुंदवाडला कृष्णा-वेणी यात्रेचा समारोप
कुरुंदवाड, ता. २४ ः शेतीत आधुनिकता आणण्यासाठी शेती प्रदर्शनाची गरज आहे. कुरुंदवाडची यात्रा ही शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी निर्माण केली आहे. यात्रा आणि यात्रेतील शेती प्रदर्शनामुळे अनेक प्रगतशील शेतकरी नावारुपास आले आहेत. ही परंपरा कायम टिकवण्यासाठी यात्रा समितीला सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर यांनी दिली.
कुरुंदवाड नगरपरिषद व कृष्णावेणी शेती जनावरे प्रदर्शन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृष्णा-वेणी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित शेती, जनावरे आणि कृषी प्रदर्शनाचे बक्षिस वितरण, यात्रेच्या समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्याधिकारी तथा प्रशासक आशिष चौहान, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, उदय डांगे, अक्षय आलासे आदी प्रमुख उपस्थित होते. दादासाहेब पाटील म्हणाले, ‘आपल्या अन्नदाता शेतकऱ्याच्या शेतीपिकाचे प्रदर्शन भरवून त्यांच्या पिकांचे कौतुक करून शेतीतील नवनवीन पिके उत्पादित करण्यासाठी उल्हासित करणारी ही यात्रा आहे. पूर्वजांनी निर्माण केलेले प्रदर्शन हे आजच्या शेतकऱ्यांच्यासाठी प्रेरणा देणारी आहे.’
उदय डांगे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. शेतीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकरी दिलीप घोरपडे, उदय भबीरे, यात्रेसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल विष्णुपंत माळी, वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या माध्यमातून पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंचा आणि यात्रेतील जनावरे शेती प्रदर्शनातील विजेत्यांना व विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंना मान्यवरांच्याहस्ते बक्षीस वितरण केले. आभार बबलू पोवार यांनी मानले. राजेंद्र घारे, बापूसाहेब आसंगे, शाहीर आवळे, राजेंद्र देवकाते, महेंद्र माळगे, इकबाल बागवान, कुदरत भुसारी, रमेश भुजुगडे, अक्रम गोलंदाज, राजेंद्र बेले आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

SCROLL FOR NEXT