कोल्हापूर

टुडे १०२

CD

कुरुंदवाड येथे उद्या
आपत्ती व्यवस्थापन बैठक

कुरुंदवाड, ता.२४ ः कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेल्या कुरुंदवाड शहरात दरवर्षी महापुराचा धोका निर्माण होतो. जुलै-ऑगस्टमधील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता सोमवारी (ता.२६) पालिका सभागृहात १२ वाजता आपत्ती व्यवस्थापनासाठी बैठक आयोजिक केली आहे.
बैठकीसाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी टीना गवळी यांनी आजी-माजी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, संस्था, सोसायट्यांचे प्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. बैठकीत अग्निशमन दल, आरोग्य, जलसंपदा, महसूल, पोलिस विभाग तसेच स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून पूरस्थिती निर्माण झाल्यास करावयाच्या उपाययोजनांची रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. शहरातील पूरप्रवण क्षेत्रांचा नकाशा व सुरक्षित स्थलांतर केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आपत्कालीन मदत केंद्र व हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित होणार असून, त्याद्वारे मदत मागवता येणार आहे. नौका, लाईफजॅकेट्स, ट्रॉली, दोर, सायरन, पाणी पाऊच व प्राथमिक औषधे यासारखे बचाव साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सतर्क नागरिक,
सज्ज प्रशासन ः गवळी
पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रांची व्यवस्था केली जाईल. तेथे अन्नधान्य, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी व आरोग्य तपासणीची सुविधा राहील. माध्यमांद्वारे सतर्कतेच्या सूचना, जनजागृती फलक, मोबाईल संदेश व सामाजिक माध्यमांचा वापर करून नागरिकांना सतर्क करण्यात येणार आहे, असे सांगून मुख्याधिकारी गवळी यांनी ‘सतर्क नागरिक आणि सज्ज प्रशासन‘ या संकल्पनेवर भर देत, पूर आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Raghu Sharma? मुंबई इंडियन्सने क्रीडा आहारतज्ज्ञ अन् ट्रेनरला दिली पदार्पणाची संधी; CSK विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार

HSC Exam Result : बारावी निकालात सलग दुसऱ्या वर्षी घट; मंगळवेढ्याचा निकाल 80 टक्के

मुंबईत महागाईचा स्फोट! वडापावपासून चहापर्यंत... रेस्टॉरंट मालकांनी किंमती वाढवल्या, जाणून घ्या सध्याचे दर

Vaibhav Sooryavanshi : वैभव 'बालमजूर'; त्याने क्रिकेटपेक्षा अभ्यासावर लक्ष द्यावे! राजस्थान रॉयल्सविरुद्ध FIR दाखल होणार? Video

FDA Rule: ग्राहकांची फसवणूक थांबणार! मेनू, बिल आणि डिस्प्लेवर पनीरची खरी माहिती द्यावीच लागणार, FDA चा कडक नियम लागू

SCROLL FOR NEXT