कोल्हापूर

बावडा बातमी दुरुस्ती

CD

16092
भगव्या रंगात न्हाऊन निघाला बावडा परिसर
कसबा बावडा, ता. ३ ः जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय ... अशा घोषणांनी बावड्यातील भगवा चौक परिसर दुमदुमला. भगवे झेंडे, भगव्या टोप्या परिधान करत आज दुपारी नागरिकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चबुतऱ्यावर बसवण्यात आला. यावेळी बावडेकरांनी मोठी गर्दी केली होती. तसेच विजय स्वतंत्र तरुण मंडळ, माळ गल्ली येथील महिलांकडून पुतळ्याच्या पाठीमागे असलेल्या महाद्वाराला मानाचे तोरण बांधण्यात आले.
कसबा बावड्यातील भगवा चौक येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मुख्य उपस्थितीत असणार आहेत.
या सोहळ्यासाठी भगवा चौक येथे मोठे व्यासपीठ तयार केले आहे. तसेच मुख्य रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजे कागलवाडीमार्गे वळवली आहे. भगवा चौक परिसरापासून पाठीमागे गंगा भाग्योदय कार्यालयापर्यंत आणि पुढे पाटील गल्लीपर्यंत आकर्षक सजावट केली आहे. तसेच डोळे दीपवणारी विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे बावडा परिसर भगव्या रंगात न्हाऊन निघाला आहे. घरोघरी भगवे झेंडे लावले आहेत.
अनावरण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बावड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

RR vs DC Live: फुलटॉसवर यशस्वी गेला अन् भन्नाट यॉर्करने वैभव सूर्यवंशीचा त्रिफळा उडवला; Kyle Jamieson चे सेलिब्रेशन पाहा Video

SCROLL FOR NEXT