कोल्हापूर

कोतोली येथे सकल हिंदू संमेलन

CD

कोतोलीत सकल हिंदू संमेलन
कोतोली ता. २० : कोतोली (ता. पन्हाळा) येथील सकल हिंदू संमेलन समिती यांच्यातर्फे येथील हनुमान मंदिर येथे हिंदू संमेलन झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनीलबापू लाड, कौलापूरकर उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, ‘‘देव, देश आणि धर्म टिकला तरच तुम्ही आम्ही टिकू. नाहीतर पार्शियन लोकांसारखी आपली स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. पार्शियन लोक विखुरली गेली आणि अख्खा देश संपला आणि तेथे इराण देश तयार झाला. असे व्हायला नको असेल तर हिंदू म्हणून सर्वजण एक झालो पाहिजे. आपल्यात मतभेद असतील; पण मनभेद असता कामा नये. हेवेदावे बाजूला ठेवून हिंदू म्हणून एक व्हायला पाहिजे. जातीभेदाला अजिबात थारा देऊ नका, एकत्र कुटुंब पद्धतीचा वापर करा, पर्यावरण वाचवा, नैसर्गिक साधनांचा वापर करा, युज ॲंड थ्रो संस्कृतीला स्वीकारू नका. भारतीय संस्कृतीचा अवलंब करा, पाणी वाचवा, निसर्ग वाचवा असे ते म्हणाले. तसेच सर्व परंपरा आणि सण हे निसर्स नियमानुसार चालत आले आहेत; त्यामुळे देव, देश, धर्म, संस्कृती आणि परंपरा याचे पालन करूया.’’ यावेळी आनंदा आंगठेकर, प्रशांत पाटील, सागर वरपे, संभाजी सुतार, राजेंद्र लव्हटे, प्रवीण पाटील, कृष्णात पाटील, विठ्ठल पाटील, पांडुरंग गांजवे, सुनील पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : 3 लाखांची सुपारी अन् अपघाताचा बनाव! विम्याचे 30 लाख मिळवण्यासाठी भावोजीचा गेम करणाऱ्या मेहुण्याला पुराव्यासह बेड्या

World Brain Tumor Day 2026: ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय? सौम्य आणि घातक गाठींमधील महत्त्वाचा फरक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : बिहारमधील कोचिंग सेंटरमधील गोळीबार प्रकरणात जामीन अर्जावर आज सुनावणी

Maharashtra Farmer Loan Waiver : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ; पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

दादरमध्ये बेस्ट बसची अनेक गाड्यांना धडक, दोघांचा मृत्यू; १० ते १२ जण जखमी

SCROLL FOR NEXT