पट्टी- किरण माळी वाढदिवस विशेष
---------
06473
06472
लीड
कर्मवीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संचालक तसेच विकासाभिमुख नेतृत्व किरण आण्णा माळी यांचा सोमवारी (ता.२) ५३ वा वाढदिवस यानिमित....
विकासाभिमुख नेतृत्व
कुंभोज येथील सर्वसामान्य कुटुंबातील किरण माळी यांचा जन्म २ जून १९७२ ला झाला. कुंभोज विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत माळी, ''शरद''चे माजी संचालक बी. एम. माळी या दोन्ही मामांकडून त्यांना राजकारणाचा वारसा मिळाला. १९९८ मध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून नोकरीचा प्रारंभ केला. या दरम्यान त्यांनी विक्रम क्रीडा मंडळाच्या माध्यमातून दिवंगत आमदार बाबा कुपेकर, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी खासदार जयवंतराव आवळे यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. १० वर्षे वाढदिवसानिमित्त ते रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपतात.
गावातील श्रद्धास्थान हनुमान मंदिर व गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी युवकांना संघटित करून जीर्णोध्दार समितीची स्थापना केली. हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी माजी सरपंच प्रकाश पाटील यांच्या सहकार्याने तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांच्या पाच लाख रुपयांच्या निधीतून हनुमान मंदिर सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण केले. भाविकांच्या देणगीतून गणेश मंदिराची निर्मिती केली. २०१७ मध्ये आमदार सतेज पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार राजू आवळे यांनी कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून श्री. माळी यांना काँग्रेसची उमेदवारी दिली. यावेळी त्यांचा अल्पमतांनी पराभव झाला. मात्र, पराभवाने न खचता त्यांनी समाजकार्य अविरतपणे सुरू ठेवले. २०२० मध्ये कोरोना काळात कोविड रुग्णांसाठी लोकवर्गणीतून व किरण माळी युवा मंचच्या माध्यमातून रयत गुरुकुलमध्ये कोविड सेंटर सुरू केले. आमदार राजू आवळे यांच्या निधीतून गावात सुमारे तीनपेक्षा अधिक कोटींची विकास कामे केली. अनेक वर्षे रखडलेला बुवाचे वाठार रस्ता यासह प्रलंबित पाणंद रस्त्याचे काम मार्गी लावले. आमदार सतेज पाटील, आमदार राजू आवळे यांच्या विशेष प्रयत्नातून सुसज्ज ग्रामसचिवालयाचा व प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावला.''जवाहर''चे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले यांच्या सहकार्याने आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून बायपास रस्त्यासाठी एक कोटी १७ लाखांचा निधी मंजूर करून हा प्रश्न मार्गी लावला.
कर्मवीर ग्रामीण बिगर शेती पतसंस्था व श्रीराम शेतकरी पाणीपुरवठा संस्था या संस्थेत त्यांनी अनेक वर्षे संचालक म्हणून काम केले आहे. गतवर्षी झालेल्या कुंभोज विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत किरण माळी यांच्या नेतृत्वाखालील पॕनेलने निर्विवाद वर्चस्व मिळविले. चार वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत किरण माळी यांच्या पॕनेलने १७ पैकी १२ जागा जिंकून सत्ता काबीज केली. पत्नी शुभांगी यांना विक्रमी मतांनी निवडून आणले. त्यांच्या यशस्वी वाटचालीत बंधू नंदकुमार माळी, सुहास माळी, वहिनी पंचायत समितीच्या माजी सदस्या निर्मला माळी, माजी सरपंच माधवी माळी, पत्नी शुभांगी माळी यांचे सहकार्य लाभत आहे.
अशा या नेतृत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
--------
- पुरवणी संकलन : राजू मुजावर, कुंभोज.
-------------
-चौकट
वाढदिनी आज विविध कार्यक्रम
येथील किरण माळी युवा मंचतर्फे ग्रामपंचायतीचे गटनेते किरण माळी यांचा वाढदिवस सोमवार (ता. २) विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त हनुमान मंदिर सांस्कृतिक भवनमध्ये सकाळी ९ ते १ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. यावेळी रक्तदाते, विविध क्षेत्रांतील मान्यवर व गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली.
KUM25B06472, KUM25B06473
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.