कोल्हापूर

सावर्डे बुद्रुक येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते शुभारंभ : जलजीवन मिशन अंतर्गत ५ कोटींची योजना

CD

04223

नळ पाणीपुरवठा योजनेचा
सावर्डे बुद्रुकला प्रारंभ

५ कोटींची योजना; सुहासिनीदेवी घाटगेंची उपस्थिती

म्हाकवे, ता. ९ : सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथे जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत मंजूर झालेल्या ४ कोटी ९९ लाख ९१ हजार ३२४ रुपयांच्या नळपाणी पुरवठा योजनेचा प्रारंभ श्री छत्रपती शाहू साखर कारखाना चेअरमन सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच छाया हिरूगडे होत्या.
बिद्री संचालक बाबासाहेब पाटील म्हणाले, ‘जनतेने यापूर्वी अनेकांना संधी दिली आहे, त्याप्रमाणे अहोरात्र जनतेसाठी वाहून घेतलेल्या समरजितसिंह घाटगे यांना एकवेळ संधी देवून आमदार करावे. ते मतदारसंघाचा कायापालट करतील.’
गोविंद हिरूगडे यांनी स्वागत तर प्रास्ताविक प्रताप पाटील यांनी केले. माजी सरपंच रघुनाथ सिरसे, बाबूराव पाटील, शाहू साखरचे संचालक डी. एस. पाटील, सचिन मगदूम, भाऊसाहेब कांबळे, संचालिका रेखाताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास राजश्री चिंदगे, विलास अस्वले, म्हाकवेचे उपसरपंच धनाजी पाटील उपस्थित होते. विनायक हिरूगडे यांनी आभार मानले.

राजेंचे सहकार्य....
सावर्डे बुद्रुकला कायमपणे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. तीन पाणी योजना होऊनही गावाची तहान भागवू शकल्या नाहीत. त्यामुळे ही योजना मंजूर करून राजेंनी मोठे सहकार्य सावर्डे बुद्रुक ग्रामस्थांना केल्याचे भाजप किसान मोर्चा अध्यक्ष प्रताप पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामती, राहुरीत पोटनिवडणुकीची घोषणा, केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा केल्या जाहीर

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Gas Crisis: इंधन संकटाची शक्यता! गॅस वितरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष नियम जारी; प्राधान्य कुणाला? पाहा यादी...

LPG Cylinder Blast: एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, ७ जण जखमी

Latest Marathi Live Update : Jalna: अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुलासोबत उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली

SCROLL FOR NEXT