कोल्हापूर

मुश्रीफ वाढदिवस पुरवणी लेख

CD

किमयागार नेतृत्व

जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात आढळस्थान निर्माण करणारे किमयागार नेतृत्व म्हणजे लोकप्रिय नेते आमदार हसन मुश्रीफ होय. राजकारणात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे, कागल तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणणारे राज्याचे माजी ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे...
--------
जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून केलेले कार्य वेगळेच समाधान देऊन जाते. जनतेच्या समस्यांचे निवारण केल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर उमटलेले हसू व मिळणारा आनंद जीवनातील कोणत्याही आनंदापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. अशा विचाराने कार्य करणारे मुश्रीफ साहेब गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे आधारवडच आहेत.
राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रात वावरत असताना अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते. हजारो लोकांचा संपर्क,समस्यांची नेमकी जाण. त्यावर नेमका उपाय आणि त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. लोकांना नेमके काय हवे आहे हे शोधण्याची दृष्टी लागते. आणि आपल्या जनतेला जे हवे आहे ते मिळवून देण्यासाठी झपाटा आणि धडाका असावा लागतो. राज्याच्या राजकारणात अशी व्यक्ती शोधायची म्हटले तर त्यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव सर्वप्रथम असेल.
हसन मुश्रीफ म्हणजे जनतेच्या सेवेसाठी कधीही न थकणारे नेते आहेत. विधानसभेला पहिल्यांदा पराभूत झाल्यावर हार न मानता, जिद्दीने पुढील प्रत्येक निवडणूक ते जिंकत गेले. अफाट कार्यक्षमता, गोरगरीब , वंचित कष्टकरी, निराधार यांच्याविषयीची करुणा तसेच गट न पाहता अहोरात्र कष्ट घेण्याची मानसिकता यामुळे सलग पाच विधानसभेच्या निवडणुकीत ते विजयी झाले .
मुश्रीफ यांच्या रूपाने कागल मतदारसंघाला सदैव कार्यरत असणारा कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी लाभला. तसेच इथल्या जनतेनेही कोणताही भेदभाव न ठेवता नामदार मुश्रीफ यांना त्यांच्या सेवेचे पुण्य त्यांच्या पदरात टाकले.त्यांनी केलेल्या कामामुळेच जनतेच्या सिंहासनावरील खरे खुरे राजे आहेत.
राज्याचे ग्रामविकासमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी जनहिताचे निर्णय घेण्याचा धडाका लावला. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांना इमारत बांधकामासाठी सहायक अनुदाने घोषित केली. तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम राबविले. पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरीत केला .स्मार्ट ग्राम योजना राबविली .स्मार्ट ग्राम योजनेची बक्षीस रक्कम दुप्पट करून या योजनेस स्वर्गीय आर. आर .पाटील स्मार्ट ग्राम योजना असे नाव देऊन आबांच्या प्रती कृतज्ञता जपली .या योजनेमुळे राज्यातील खेडे गावांचा कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्रभावीपणे राबवून राज्यातील खराब झालेले रस्ते चकचकीत केले. ग्रामपंचायतींना नवीन इमारत बांधकामासाठी व दुरुस्तीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले. ग्रामपंचायतींना जनसुविधा साठी विशेष अनुदान घोषित केले. रस्ते, गटारे ,अन्य मुलभूत सुविधा साठी विशेष कार्यक्रम आखला.
ग्रामविकास विभागामार्फत स्वच्छ, सुंदर आणि हरित ग्राम तयार करण्यासाठी नविन उपक्रम राबविले. ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्र्य निर्मूलनासाठी योजना आखल्या. प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींचे सक्षमीकरण केले. पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठी अनेक योजना आखल्या. इंदिरा आवास योजनेअंतर्गत राज्यातील बेघर लोकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले.
सत्तेच्या माध्यमातून मुश्रीफसाहेबांनी केलेले काम न भूतो न भविष्यतो असेच आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना.
04325
- प्रकाश वाडकर
व्हन्नाळी ता.कागल
-----------------------
04325

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT