कोल्हापूर

साकेतील जनावरांच्या मृत्यूची वरिष्ठ पातळीवर चौकशी मृत्यू विषबाधा होऊन की अन्य कारणाने

CD

साकेतील जनावरांच्या मृत्यूची
वरिष्ठ पातळीवरून चौकशी

म्हाकवे, ता.१८: साके (ता.कागल) येथील तानाजी सातापा गवसे यांच्या चार गाईंचा मृत्यू विषबाधेने झाला आहे की अन्य कारणाने याबाबत परिसरात चर्चा आहे. या गायींचा मृत्यू कशाने आणि कधी झाला, याची सखोल चौकशी वरिष्ठ पातळीवरून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केली जात आहे. या घटनेनंतर शासकीय पातळीवर खळबळ उडाली असून, घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांना दखल आहे. गायींचा मृत्यू विषबाधा होऊन की अन्य कारणाने झाला आहे, हे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या चौकशी अहवालातून स्पष्ट होईल.
गवसे यांचा व्हन्नाळी साके रस्त्यावर पिण्याच्या आडाजवळ गोठा आहे. अज्ञाताने गवसे यांच्या शेतातील वैरणीवर विषारी औषध फवारणी केली. ही वैरण त्यांनी कापून गायींना घातल्यामुळे या गायींचा मृत्यू झाला आहे, अशी चर्चा आहे. अज्ञातांनी केलेल्या विषबाधेने जनावरांचा मृत्यू झाला असेल तर या घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. महत्त्वाची म्हणजे या गायींचा मृत्यू अन्य कारणांनी झाला आहे का, याचाही सखोल चौकशी शासकीय पातळीवरून सुरू आहे. गोठ्यातील अन्य गायी व लहान वासरू यांना विषबाधा झालेली नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ बैठक घेतली, परंतु या घटनेची नोंद पोलिसांत झालेली नाही. याचे कारणही गुलदस्त्यातच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 4 पट वाढणार? रेल्वे युनियनचा मोठा प्रस्ताव; कोणाचा पगार किती वाढणार?

FACT CHECK : वैभव सूर्यवंशीला Mumbai Indians कडून ३० कोटींची ऑफर; ललित मोदीने सत्य समोर आणलं, नेमकं काय सुरूय?

CBSE च्या नव्या नियमाने विद्यार्थ्यांवर संकट? त्रिभाषा धोरणावर सुप्रीम कोर्ट संतापले, केंद्र सरकारला नोटीस!

'मराठी असून हिजाब का घातला?' अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पोस्ट Viral

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

SCROLL FOR NEXT