अन्नपूर्णा शुगर कारखान्याचे
पावणेसात कोटींचे बिल आदा
सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. २७ : केनवडे (ता. कागल) येथील श्री अन्नपूर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स कारखान्याकडून चालू गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाचे दुसऱ्या पंधरवड्यातील बिल प्रतिटन ३०२० रु. प्रमाणे एकूण रक्कम ६ कोटी ८० लाख ९३ हजार रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन संजय घाटगे यांनी दिली. कारखान्यांत तयार होणाऱ्या केमिकल फ्री गूळ पावडर व सल्फरलेस खांडसरी साखर ही उत्पादने आरोग्यदायी असल्यामुळे या उत्पादनांना जागतिक बाजारात मेठी मागणी आहे. शेतकऱ्यांनी दोन वर्षाप्रमाणेच यंदाही संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन घाटगे यांनी केले. यावेळी संचालक दिनकर पाटील, आनंद साठे, एम. बी. पाटील, के. के. पाटील, तनाजी पाटील, मुख्य व्यवस्थापक शामराव चौगले, मुख्य अभियंता राजू मोरे, चिफ केमिस्ट सुनील कोकितकर, शेती अधिकारी श्रीनिवास कुलकर्णी, शिवराज भरमकर, पर्चेस मॅनेजर कृष्णात कदम उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.