कोल्हापूर

खोतवाडीत मानकरी होम मिनिस्टरच्या माधुरी खोत

CD

03059
‘होम मिनिस्टर’च्या
मानकरी माधुरी खोत
माजगाव ता.२३ ः ग्रामीण भागातील महिलांना शेती व घरकामातून एक दिवस विरंगुळा मिळण्यासाठी खोतवाडी (ता. पन्हाळा) येथील माजी सरपंच कै. गणपती बापू खोत यांच्या स्मरणार्थ सरपंच फाउंडेशनतर्फे संतोष वडेकर प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रम झाला. प्रथम क्रमांक पैठणच्या मानकरी माधुरी कपिल खोत बनल्या. द्वितीय क्रमांक सोन्याची नथच्या मानकरी मेघा नीलेश चोरगे व तृतीय क्रमांक जोडवे रूपाली सागर खोत मानकरी ठरल्या. ८० महिला कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
खोतवाडीत सरपंच फाउंडेशनची स्थापना वर्षांपूर्वी झाली. फाऊंडेशनतर्फे प्रवाशांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था, शालोपयोगी वस्तूंचे वाटप, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले आहेत. यावेळी बाळाबाई साबळे, अलका खोत, इंदूबाई खोत, भारती खोत, शुभांगी जाधव, रूपाली गुरवळ व फाउंडेशनचे महेश गुरवळ, विक्रम खोत, दत्तात्रय रणदिवे, आशुतोष खोत, सुशांत खोत, संग्राम खोत, संतोष साबळे, सतीश गौड, नीलेश चोरगे उपस्थित होते. ओम श्रीखंड भैरवनाथ व लाईट एस. के. फायर प्रायोजक होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली लोकसभेतून माघार, 'या' नेत्यांमध्ये होणार थेट लढत

Russian Attack Video: रशियाच्या मिसाईल हल्ल्यात 'हॅरी पॉटरचा किल्ला' उद्धवस्त; 5 जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांना आलेली धमकी पोकळ; घाबरण्याची गरज नाही.. गृह मंत्रालयाची माहिती

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT