04910
पोर्ले बंधाऱ्याचे बरगे काढण्यास प्रारंभ
‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; चौदा गावांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
माजगाव, ता. ११ ः यवलूज- पोर्ले (ता. पन्हाळा) दरम्यान कासारी नदीवरील बंधाऱ्याचे ‘बरगे’ काढण्यास अखेर पाटबंधारे विभागाकडून सुरुवात झाली आहे. मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढून बंधारा ओसंडून वाहू लागला होता. यामुळे नदीकाठच्या पिकांना कृषी पंपासह बंधाऱ्याला धोका निर्माण झाला होता. यासंदर्भात ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध करून ‘त्वरित बरगे काढा’ अशी मागणी केली होती. पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यावरील बरगे काढण्याचे काम प्रत्यक्ष सुरू केल्यामुळे चौदा गावच्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे
निटवडे येथे कासारी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा हा बंधारा शेवटचा असून उन्हाळ्यात यवलूज, पोर्ले, माजगाव, पडळ, सातार्डे, उत्रे, वाघवें, माळवाडी, शिंदेवाडी-खोतवाडी, देवठाणे, आळवे, पिंपळे आणि गोलीवडे अशा चौदा गावांच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा मुख्यआधार आहे.
मे महिन्यात जोरदार मॉन्सूनपूर्व पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरले. कासारी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले. परंतु बंधाऱ्याची बरगे वेळेवर न काढल्यामुळे पाण्याचा प्रवाहाला अडथळा झाला. परिणामी, नदीचे पाणी पात्राबाहेर जाऊन अनेक शेतकऱ्यांचे कृषी पंप बुडाले. तसेच झाडेझुडपे अडकून बंधाऱ्याच्या बांधकामाला धोका निर्माण झाला होता. ‘सकाळ’ने ‘त्वरित बरगे काढा’ मथळ्याखाली सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. पावसाने उसंत दिल्यामुळे पाटबंधारे विभागाने प्रत्यक्ष बरगे काढण्यास सुरवात केली असून बंधाऱ्यात अडकलेली झाडेझुडपेही काढली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.