कोल्हापूर

मुरगूडला शनिवारी समता परिषद.

CD

समता परिषदेचे उद्या
मुरगूड येथे आयोजन

डॉ. राजरत्न आंबेडकर करणार संबोधित

मुरगूड, ता. ३ : भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर शनिवारी (ता. ५) मुरगूड (ता. कागल) येथे येणार आहेत. यानिमित्त धम्म जागृती अभियानांतर्गत ‘एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे’ हा उद्देश घेऊन समता परिषद आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचे समन्वयक महेश धम्मरक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धम्मरक्षित म्हणाले, ‘संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या उद्धारासाठी समर्पित करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी अतुलनीय कार्य केले आहे. पण त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार फारसा झालेला नाही. संपूर्ण समाज अस्थिर व असुरक्षित बनत चाललेला आहे. अशा समाजाला स्थिरता देण्यासाठी व मानवतावादी बनवण्यासाठी धम्म जागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी समता परिषदेचे आयोजन केले आहे.’
समता परिषद हुतात्मा तुकाराम चौकामध्ये शनिवारी सायंकाळी पाच वाजता होणार असून, परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर संबोधित करणार आहेत. यावेळी राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत जाधव, महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा अरुणाताई इंगळे, कर्नाटकचे अरविंद गट्टी, कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभारी संदीप कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT