कोल्हापूर

म्हाळुंगे ते परिते खराब रस्त्याच्या कामा ला मुहूर्त कधी मिळणार.?

CD

00288
म्हाळुंगे ते परिते रस्त्याची चाळण

नंदगाव; ता. २५ : म्हाळुंगे ते परिते (ता. करवीर) दरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. कारण रस्त्यांमध्ये पडलेले मोठमोठे खड्डे व खडी-मुरूम निघाल्याने खड्डे चुकवताना खडीवरून वाहन घसरून कधी अपघात होईल हे सांगता येत नाही. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
म्हाळुंगे ते परिते रस्ता कोल्हापूर-गारगोटी व कोल्हापूर-राधानगरी या दोन मुख्य रस्त्यांना जोडणारा आहे. तसेच राधानगरी तालुक्यातून गोकुळ शिरगाव व कागल औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला जाणाऱ्यांची संख्याही जास्त असल्यामुळे रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते. रात्रपाळी करून येताना खऱाब रस्त्यामुळे अनेकदा वाहने पंक्चरही होतात. पावसाळ्यात तर रस्त्यातील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघातही होतात. मध्यंतरी रस्ता मंजूर झाल्याची चर्चा होती. पण कार्यवाही काहीच नाही. हा रस्ता चांगल्या दर्जाचा करावा, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशांकडून होत आहे.

कोट
सात -आठ वर्षापासून रस्त्यावरून कागल औद्योगिक वसाहतीत कामाला जातो. खराब रस्त्यामुळे कामावर जायला वेळ होतो. छोट्या-मोठ्या अपघातांनाही सामोरे जावे लागते. तरी लवकर रस्ता करावा.
- अमित भोपळे, प्रवासी खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी)

रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने रस्त्यावर वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहेत. येणाऱ्या पावसाळ्याआधी हा रस्ता करावा.
- प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते, म्हाळुंगे

साडेपाच किमीचा रस्ता पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून होणार आहे. त्यासाठी ४.१९ कोटी रुपयांची वर्क ऑर्डर एप्रिलमध्ये मिळेल. त्यानंतर रस्ताकामाला सुरुवात होईल.
- एन. के. कांबळे, अभियंता, पंतप्रधान ग्रामीण सडक योजना, कोल्हापूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT