कोल्हापूर

कुशल मनुष्यबळाभावी सुक्ष्म लघू उद्योग संकटात

CD

उद्योगासमोरील आव्हाने भाग - २
....

मनुष्यबळाचा अभाव अन कामातील अनिश्चितता
उद्योजक चक्रव्यूहात ः आर्थिक घडी सावरताना होतेय कसरत

अभिजित कुलकर्णी, सकाळ वृत्तसेवा

नागाव, ता. ९ : माफक दरातील कुशल मनुष्यबळ हे कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाचे मुख्य वैशिष्ट्य. पण आता परिस्थिती बदलत आहे. कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याने सूक्ष्म आणि लघु उद्योजकांची स्वतःला सावरण्याची धडपड व्यर्थ ठरत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित यंत्रसामग्रीसाठी लागणारी मोठी गुंतवणूक सूक्ष्म आणि लघु उद्योगांना न पेलणारी आहे. कामातील अनिश्चिततेमुळे काही उद्योगांमध्ये काम असते तेव्हा कामगार नसतात आणि कामगार असतात तेव्हा काम नसते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्वतः काम करूनही आर्थिक घडी अधिकच विस्कळीत होत असल्याने हे उद्योजक आर्थिक चक्रव्यूहात सापडले आहेत.
कुशल मनुष्यबळाच्या सहकार्यातून गुणवत्तापुर्ण निर्मिती आणि वेळेत पुरवठा हे कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाचे मॉडेल राहिले. बदलेल्या औद्योगिक धोरणात आॅटोमाईझेशनमुळे कुशल आणि अकुशल एकाच मेजरमेंटवर आले. पूर्वीचा कुशल कामगार दोन चार मशिन घेऊन उद्योजकांच्या पंक्तीत आला. येथूनच सुक्ष्म - लघू उद्योग आणि मध्यम - मोठे उद्योग यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले. या प्रवासात सुक्ष्म - लघु उद्योगाने महिनाच्या शेवटी किती मिळवायचे हे मध्यम - मोठे उद्योग ठरवत आहेत.
अवजड व्यावसायिक वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या विविध स्पेअर पार्ट निर्मितीमध्ये देशात कोल्हापूरची महत्त्वाची भूमिका आहे. वाढत्या उत्पादन क्षमतेला पुरेसे कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याने उद्योग अडचणीत येत आहेत. लेबर चार्जेसवर काम करणाऱ्या सूक्ष्म आणि लघु उद्योगात समाविष्ट उपठेकेदारांची संख्या सर्वाधिक आहे. मध्यम आणि मोठ्या उद्योगात सर्व सेवा सुविधा व चांगले वेतन मिळत असल्याने स्थानिक कुशल मनुष्यबळ तेथे गुंतले. परिणामी सूक्ष्म आणि लघु उद्योगाला ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षित करून काम करून घ्यावे लागते. हे तरुणही सहा महिने ते वर्षभर अनुभवानंतर मध्यम व मोठ्या उद्योगात संधी मिळताच काम बदलतात. नव्वद टक्के सूक्ष्म उद्योगात स्वतः मालक काम करतात. अशा परिस्थितीत वेळेत गुणवत्तापूर्ण पुरवठा देऊ शकत नसल्याने अनेकांना काम टिकवणेही अवघड बनले आहे.
-------

शेकडो मशिनरींची ‘शिफ्ट'' बंद

लेथ मशीन हे इंजिनिअरिंग उद्योगातील मातृ मशीन म्हणून ओळखले जाते. पण कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि कामातील त्रुटी टाळण्यासाठी लेथऐवजी सीएनसी, व्हीएमसी व एचएमसी यासारखी अत्याधुनिक यंत्रे आली. त्यामुळे लेथ आणि टर्नर कालबाह्य झाले. सीएनसी, व्हीएमसी व एचएमसी मशीनवर काम करण्यासाठी किमान वेतनावर कुशल ऑपरेटर मिळत नसल्याने शेकडो मशिनरींची शिफ्ट बंद राहत आहे. मोठ्या उद्योगांनी यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान स्वीकारले आहे. पण त्यालाही स्वतःच्या काही मर्यादा आहेत आणि सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाला सध्यातरी हे तंत्रज्ञान परवडणारे नाही.
.....

चौकट

लघु उद्योगाची वाटचाल धोकादायक वळणावर

मनुष्यबळाचा आभाव, न परवडणारे वीज दर, गरज नसताना कर्ज काढून भरावी लागणारा जीएसटी रक्कम, थकीत कर्जासाठी बँका व फायनान्स कंपन्यांचा तगादा, वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि मोठ्या कंपन्यांकडून लहान उद्योगांची सुरू असणारी पिळवणूक अशा विविध आव्हानांचा सामना करत सुरू असणारी सुक्ष्म व लघु उद्योगाची वाटचाल अतिशय धोकादायक वळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT