01861
खडकेवाडा सरपंचपदी बी. एस. कांबळे
नानीबाई चिखली ता. ८ ः खडकेवाडा (ता.कागल) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मुश्रीफ गटाचे बी. एस. कांबळे यांची एकमताने निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी मच्छिंद्र कुंभार यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक सूर्यकांत कुंभार यांनी सहकार्य केले .
मुश्रीफ गटांतर्गत ठरल्याप्रमाणे सरपंच भाऊसाहेब पाटील यांनी कालावधी पूर्ण केल्यानंतर राजीनामा दिला. त्यानंतर सभेत बी. एस. कांबळे यांची एकमताने निवड केली. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नंदकुमार घोरपडे, मकबुल मकानदार, रमेश कदम, रामदास किल्लेदार, बाबुराव मेटकर, भाऊसो पाटील, युवराज जाधव, हर्षवर्धन घोरपडे, विठ्ठल माळी, सुरेश पाटील, सुनिल कदम, हरी खवरे, डॉ. सुशांत कांबळे, विनोद पाटील, सतीश कुराडे, उत्तम पोवार, रामचंद्र कांबळेंसह कार्यकर्ते उपस्थित होते .
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.