कोल्हापूर

जोतिबा चैत्र यात्रा ... अधिक्षकांनी व अधिकार्‍यांनी डोंगर काढला पिंजून

CD

02248

जोतिबा डोंगरः येथे सोमवारी विशेष पोलीस महानिरिक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधिक्षक डॉ . शैलेश बलकवडे चैत्र यात्रेच्या तयारीची पाहाणी करताना .
....

मुख्य मंदिर,पालखी मार्गाची पाहणी

चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेने डोंगर काढला पिंजून


जोतिबा डोंगर ता. ३ः दख्खनचा राजा श्री जोतिबा यात्रेच्या तयारीच्या निमित्ताने विशेष पोलिस महानिरिक्षक सुनिल फुलारी यांनी डोंगरावर भेट देऊन मुख्य मंदिर व पालखी मार्गाची पाहणी केली तसेच यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला
पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे, उपअधिक्षक मंगेश चव्हाण, प्रांतधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, देवस्थानचे सचिव सुशांत बनसोडे, साहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांनी आज सर्व जोतिबा डोंगर पिंजून काढला. त्यांनी गायमुख तलावापासून ते जोतिबा मंदिर मार्ग, चव्हाण तळे, यमाई मंदिर, गिरोली दानेवाडी भागातील वाहन पार्किंग तसेच डोंगराकडे येणारे मार्ग, मुख्य रस्त्याचा परिसर, स्वच्छता गृह आदींची पाहणी केली. जोतिबा मंदिर मार्ग दर्शन रांग, सासनकाठीचा मार्ग या ठिकाणचे त्यांनी पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन कामात कुचराई करू नका, अशा सूचना पोलीस अधिक्षकांनी दिल्या. सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत ते जोतिबा डोंगरावर होते.
दरम्यान ,चैत्र यात्रेनिमित्त डोंगरावर राज्यभरातून भाविक येताना दिसत आहेत . काल आज आलेल्या भाविकांनी यमाई मंदिर परिसर व मोकळ्या जागेत आपल्या निवाऱ्याची सोय केली आहे.आज सकाळपासून मंदिर परिसरात लातूर, बीड, कर्नाटक या भागातील भाविक सासनकाठीसह डोंगरावर दाखल झाले. मंदिर परिसरात तर हलगी पिपाणी सनई ढोल हलगी या वाद्यांनी जोर धरला. सासनकाठीवर गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीमुळे डोंगर यात्रेआधीच गुलालमय झाला असून मंगळवारी तर डोंगर गर्दीने फुलून जाणार आहे .
.....

मानाच्या सासनकाठ्या आज दाखल

चैत्र यात्रेसाठी पाडळी (जि. सातारा) येथील मानाची एक नंबरची सासनकाठी काल एकादशीच्या दिवशी गावातून बाहेर पडली. तसेच विहे (ता.कराड), किवळ (ता .कराड) या गावच्या मानाच्या सासनकाठ्या आज जोतिबा डोंगराकडे मार्गस्थ झाल्या. त्यांचे आगमन मंगळवारी होईल .
.............

चौकट

डोंगरावर पोलिस संचलन

चैत्र यात्रेनिमित्त डोंगरावर आज बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले . राज्यातून पोलिस बंदोबस्तासाठी आले आहेत . आज संपूर्ण डोंगरावर संचलन करून रंगीत तालीम घेण्यात आली .

.............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT