कोल्हापूर

जोतिबाचा दुसरा खेटा ही हाऊस फुल्ल

CD

२९०१

जोतिबा डोंगरावर लाखांवर भाविक
दुसरा खेटा हाऊस फुल्ल : चांगभलंचा जयघोष; गुलालाची उधळण
सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर, ता. ३ : जोतिबाच्या नावानं चांगभलं, यमाईदेवी, चोपडाईदेवी नंदी महादेव बद्रिकेदार काळभैरव देवाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषाने श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे आज दुसरा खेटाही हाऊसफुल्ल झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातील लाखांवर भाविकांनी डोंगरावर हजेरी लावली. भाविकांनी मंदिर परिसरात शिखरांवर गुलाल उधळला. दरम्यान, उन्हापासून भाविकांचे संरक्षण होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शन मंडप उभा केला होता.
दुसऱ्या खेट्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील अनेक भाविकांनी पंचगंगा नदीकाठी स्नान करून डोंगराकडे प्रयाण केले. डोंगर भागातील पायवाटा गर्दीने फुलून गेल्या होत्‍या. चांगभलंच्या जयघोषाने गायमुख परिसर दणाणून गेला. कुशिरे, पोहाळे, दानेवाडी, गिरोली भागातील रस्ते गर्दी फूलून गेले होते. पहाटे तीनपासूनच डोंगरावरवर भाविक येण्यास सुरुवात झाली होती. सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग डोंगरावर तळ ठोकून आहेत. पल्स पोलिओ मोहिमेमुळे डोंगर मंदिर परिसर, दक्षिण दरवाजा, यमाई मंदिर, चव्हाण तळे येथे बुथ उभारले होते. भाविकांनी लहान मुलांना पोलिओ डोस दिले. रात्री पालखी सोहळा झाला. पालखीवर गुलाल-खोबरे उधळण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी देवस्थान समितीच्या अधीक्षक धैर्यशील तिवले, सिंधिया ट्रस्टचे अधीक्षक अजित झुगर, देवसेवक, ग्रामस्थ, पुजारी उपस्थित होते.

सासनकाठीधारकांची
मंगळवारी बैठक
जोतिबा चैत्र यात्रेत सहभागी होणाऱ्या मानाच्या सासनकाठीधारकांची बैठक येत्या मंगळवारी (ता. ५) डोंगरावर होणार आहे. यामध्ये प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे-जाधव व सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Schools Closed in India: देशात एक लाख प्राथमिक शाळा बंद; संसदेत गाजला मुद्दा, खरी परिस्थिती नेमकी काय आहे?

BEST Bus: बेस्टची महायोजना! ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतूवर इलेक्ट्रिक डबल-डेकर बस धावणार, काय आहे नवा प्लॅन?

Quick Heal Story: दोनदा नापास... मोठी डिग्री नाही... 350 रुपयांच्या पगारावर काम करणाऱ्या पठ्ठ्याने उभी केली 800 कोटींची कंपनी

Latest Live Updates Marathi : नागपूरमध्ये अतिवृष्टी, दिवसभरात १७९ मिमी पावसाची नोंद, उद्या शाळांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Bhokardan Police Action: भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; बचत गटाच्या महिलांचे चोरी गेलेले ८.८० लाख परत

SCROLL FOR NEXT