कोल्हापूर

भात जोमात तर सोयाबीन कोमात . .

CD

03356

भात जोमात; सोयाबीन कोमात
जोतिबा डोंगर परिसरातील चित्र; सततच्या पावसाचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर ता. २ ः गिरोली, पोहाळे, कुशिरे, जोतिबा डोंगर, दानेवाडी, जाखले, केखले भागात यंदा पावसामुळे भात पिके जोमात आली आहेत. सततच्या पावसामुळे सोयाबीन पिके पूर्णपणे कोमात गेली असल्याचे दिसत आहे. पाठोपाठ भुईमूग, ज्वारी पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
यंदा भागात सततच्या पावसाने भुईमूग सोयाबीन ज्वारी या पिकांना दणका बसत गेला. ऊन नसल्याने पिकांची वाढ चांगली झाली नाही. सोयाबीन पिकाला शेंगा भरण्याच्या काळात अधिक पाऊस झाला परिणामी पाणी साठणाऱ्या रानात तर पिके कुजली गेली . माळरानात काही ठिकाणी निचरा होणाऱ्या जमिनीत सोयाबीन पिकाने दम धरला पण काढणीच्या वेळी पुन्हा पावसाने थैमान घातले. त्यामुळे पिकांना कोंब आले . तिथेही नुकसान सोसावे लागले. भातपिके मात्र या भागात अधिक जोमाने आली आहेत . भात पिकाला यंदा पोषक वातावरण व पाऊस असल्याने ही पिके चांगली आली आहेत . गिरोली भागात भात पिकांचे प्रमाण अधिक आहे.दसरा झाल्यानंतर भाताची काढणी सुरू केली जाईल .
चौकट
भुईमूग; ज्वारीलाही फटका
भुईमूग पिकांना पावसामुळे आरा सोडताना पोषक वातावरण निर्माण झाले नाही. त्यामुळे शेंगा कमी प्रमाणात तयार झाल्या. माळरानात किरकोळ ठिकाणी भुईमूग पिकाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. ज्वारी पीकही पावसाने काळे पडली. ऐन काढणीवेळी पावसात भिजून पिकांची काढणी करावी लागली.


कोट
यंदाचा पाऊस भात पिकासाठी पोषक आहे. सोयबीन; भूईमूग पिके अधिक पावसाने गेली. दोन वर्ष पावसाचे प्रमाण कमी असल्याने भात पीक उत्पादन कमी पिकले. काहींना केवळ पिंजरावरच समाधान मानावे लागले.
यंदा भाताच्या राशी पडतील. - राहुल पाटील; शेतकरी; गिरोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

RR vs DC Live: फुलटॉसवर यशस्वी गेला अन् भन्नाट यॉर्करने वैभव सूर्यवंशीचा त्रिफळा उडवला; Kyle Jamieson चे सेलिब्रेशन पाहा Video

SCROLL FOR NEXT