कोल्हापूर

रंकाळा ऑक्सिजन पार्कमध्ये स्वच्छता मोहीम झाडांची घेतली काळजी :ट्रॅक्टरभर प्लास्टिक केले गोळा

CD

02142
रंकाळा ऑक्सिजन पार्कमध्ये स्वच्छता
झाडांची घेतली काळजी : ट्रॅक्टरभर प्लास्टिक गोळा

सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. ११ ः ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसरात असलेल्या ऑक्सिजन पार्कमध्ये आज रंकाळाप्रेमींनी स्वच्छता मोहीम राबविली. प्लास्टिकसह इतर कचरा काढून सफाई करत झाडांची काळजी घेतली.

रंकाळा परिसरात अमृत हरित प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. चार वर्षांत झाडांची मोठी वाढ झाली आहे. रंकाळा काठ हिरवागार झाला आहे. रंकाळा ऑक्सिजन पार्क बनला आहे. फेब्रुवारी -मार्च महिन्यात झाडांची पानगळ मोठ्या प्रमाणात होते. रंकाळा परिसरात वृक्षारोपण केलेले ठिकाणी पानगळही मोठ्या प्रमाणात झाली होती. या ठिकाणी काहीजण पानांना आग लावण्याचा प्रकार करत होते. त्यामुळे रंकाळा प्रेमींनी झाडांच्या काळजीपोटी रंकाळा खण परिसरातील ऑक्सिजन पार्कमध्ये प्लास्टिक, बाटल्या, झाडांची पाने गोळा करून स्वच्छता मोहीम राबवली .यावेळी सुमारे ट्रॅक्टरभर प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आला.
शेंडापार्क होऊ नये
शेंडा पार्क येथील वनसंपदेचे आगीमुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रंकाळा पार्कचा शेंडा पार्क होऊ नये अशी चार दिवस जनजागृती करून रंकाळाप्रेमींनी स्वच्छता मोहीम राबवली.
स्वच्छता मोहिमेत रंकाळा संवर्धन संरक्षण समितीचे विजय सावंत, अभिजीत चौगुले, विकास जाधव, संजय मांगलेकर, सत्यजित सांगावकर ,यशवंत पाटील, धनंजय लिंगम, दीपक गायकवाड, किरण पडवळ, अशोक रोकडे, सुधीर राऊत, डॉ. देवेंद्र रास्कर, अमोल गायकवाड, प्रवीण वायचळ, पद्माकर रेळेकर, आनंदराव कोरे, सचिन ढणाल, इंद्रजीत सावंत, धोंडीराम चोपडे, राजेंद्र पाटील, स्वप्नील पाटील, गुंडोपंत जितकर, अमर सरनाईक सहभागी झाले होते.

चौकट
ठेकेदाराचे दुर्लक्ष
अमृत हरित प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवड, संवर्धन करण्यात आले आहे. शहरात पाच ठिकाणी झाडे लावण्यात आली. त्याची देखभाल करण्यासाठी व उन्हाळ्यात पाणी घालण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली आहे. रंकाळ्यावरील वृक्षसंपदेकडे मात्र संबंधितांचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी झाडांना पाणी देणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT