कोल्हापूर

मराठा सर्वेक्षणाचे मानधन तालुक्यांना वितरित ः खिलारे

CD

02214
कोल्हापूर : मराठा सर्वेक्षणाचे काम केलेल्या प्रगणकांना तातडीने मानधन देण्याची मागणी शिक्षक समितीने उपजिल्हाधिकारी संपत खिलारे यांच्याकडे केली.
.....
मराठा सर्वेक्षणाचे मानधन
तालुक्यांना वितरित ः खिलारे

सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. २१ ः मराठा सर्वेक्षणाचे काम केलेल्या प्रगणकांचे मानधन तालुकास्तरावर वितरित केल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संपत खिलारे यांनी दिल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा सर्वेक्षणाचे काम केले. मात्र, सर्वेक्षणाचे काम केलेल्या प्रगणकांना मानधन दिले नव्हते. मानधन मिळावे यासाठी आज प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी संपत खिलारे यांना भेटून मानधन न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सायंकाळी सर्व तालुक्यांच्या तहसील कार्यालयांकडे हे मानधन वर्ग केल्याचे खिलारे यांनी सांगितले.
प्रगणकांना मानधन मिळावे यासाठी ‘सकाळ’ने ‘प्रगणकांना मानधन तातडीने द्यावे’ अशा आशयाच्या बातम्या वारंवार प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता. त्याची दखल शासन पातळीवर घ्यावी लागली. समितीच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर, अर्जुन पाटील, कार्याध्यक्ष गणपती मांडवकर, हरिदास वर्णे, संजय कुंभार, मारुती पाटील, प्रमोद भांदीगरे, डी. एम. कुंभार, राजेश यादव, विक्रम वाघरे, बाबूराव चव्हाण, सिद्धार्थ पाटील, सी. एन. पाटील, विनायक मगदूम, अरविंद पाटील, सचिन कोल्हापुरे, दीपक पाटील आदी सहभागी झाले होते.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT