कोल्हापूर

पट्टणकोडोली यात्रा १ नोव्हेंबर पासून

CD

01687
पट्टणकोडोली :- येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा कार्यक्रम ठरविताना कर्नाटकातील हेगडे- बोते, समस्त धनगर पुजारी समाज, ग्रामपंचायत पदाधिकारी,मानकरी व ग्रामस्थ.
...


पट्टणकोडोलीची विठ्ठल-बिरदेव
यात्रा १ नोव्हेंबरपासून

पट्टणकोडोली, ता.३० : महाराष्ट्रसह पाच राज्यात प्रसिध्द असणारी पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा १ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. हेगडे, पुजारी व मानकरी यांच्यात आज झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
परंपरेनुसार कर्नाटकातील हेगडे-बोते बांधवांनी दूध उतू घालवण्याचा धार्मिक विधी काल पूर्ण केला होता. आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात यात्रा ठरवण्याचा कार्यक्रम हेगडे-बोते भक्तांच्या उपस्थितीत पार पडला.
या बैठकीत, कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांना प्रवासावेळी पोलिसांकडून कोणताही त्रास होऊ नये यासाठी पत्रव्यवहार करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी पंच मंडळींनी पुढाकार घेवून या सूचना मार्गस्थ लावण्याचे मान्य केले. यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार असल्याने सर्व शासकीय यंत्रणाही नियोजन करीत असल्याचे पंचांनी सांगितले.
यावेळी सरपंच भाग्यश्री कोळी, उपसरपंच अमोल बाणदार, प्रकाश पाटील, शरद पुजारी, नंदकुमार जोशी, राणोजी पुजारी, रावसाहेब पुजारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य,मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
...

यात्रा कार्यक्रम असा ...

बुधवार १ नोव्हेंबर ः भक्तांचा नैवेद्य, भाकणूक, पहिली पालखी.
गुरुवार २ नोव्हेंबरः दुसरी व तिसरी पालखी, सार्वजनिक नैवेद्य.
शुक्रवार ३ नोव्हेंबरः भर यात्रा, नैवेद्य व चौथी पालखी.
शनिवार ४ नोव्हेंबर ः फूट यात्रा व पाचवी पालखी.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT